Knife Attack Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

Khorlim youth knife attack: जुने गोवा येथे शनिवारी सकाळी झालेल्या एका फुटबॉल सामन्यातील वादावरून खोर्लीतील एका संघातील युवकांनी सायंकाळी वाद झालेल्या युवकावर चाकूने हल्ला केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जुने गोवा येथे शनिवारी सकाळी झालेल्या एका फुटबॉल सामन्यातील वादावरून खोर्लीतील एका संघातील युवकांनी सायंकाळी वाद झालेल्या युवकावर चाकूने हल्ला केला. यात त्याचा सहकारी अशा दोघेजण जखमी झाले. जुने गोवे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जुने गोवे पंचायत मैदानावर १५ ऑगस्ट रोजी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित युवकाने सांगितले की, सकाळी फुटबॉल सामना सुरू असताना विरोधी संघातील एकजण पडल्याने त्यांच्यात वादावादी सुरू झाली. काही वेळाने हा वाद मिटला. त्यामुळे दुपारी जेवण करून युवकाचा गट पुन्हा सायंकाळी स्थानिक मैदानावर पोहोचला.

त्यावेळी खोर्लीतील गटाने येऊन फुटबॉल खेळण्यासाठी आलेल्या युवकावर चाकूने हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT