पणजी: आशियातील सर्वांत जुनी ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेची यंदा १३४वी आवृत्ती रंगणार आहे, मात्र या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दीर्घकाळानंतर गोमंतकीय संघांची गैरहजेरी जाणवेल.
यावेळच्या ड्युरँड कप स्पर्धेसाठी गोव्यातील एकाही संघाने नोंदणी केलेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. त्यामुळे २३ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत गोव्यातील संघ खेळताना दिसणार नाही हे स्पष्ट आहे.
ड्युरँड कप स्पर्धेत गोव्यातील संघांनी आठ वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. साळगावकर एफसी व चर्चिल ब्रदर्स यांनी प्रत्येकी तीन वेळा, तर धेंपो स्पोर्टस क्लब व एफसी गोवा यांनी प्रत्येकी एक वेळ करंडक पटकावला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयएसएल स्पर्धेत खेळणाऱ्या एफसी गोवा संघाने अजून नव्या मोसमासाठी संघ बांधणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. चर्चिल ब्रदर्स संघानेही संघ प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यांनी सुपर कप स्पर्धेतूनही चर्चिल ब्रदर्सने माघार घेतली होती.
विजेतेपद
साळगावकर एफसी (३) ः १९९९, २००३-०४, २०१४
चर्चिल ब्रदर्स (३) ः २००७, २००९, २०११
धेंपो स्पोर्टस क्लब (१) ः २००६
एफसी गोवा (१) ः २०२१
उपविजेतेपद
चर्चिल ब्रदर्स (२) ः २००१-०२, २००८
स्पोर्टिंग क्लब द गोवा (१) ः २००५
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.