अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 2025-26 आयएलटी20 स्पर्धेतील साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात एमआय एमिरेट्सने दुबई कॅपिटल्सवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
या विजयासह एमआय एमिरेट्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले असून, त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. या सामन्यात कर्णधार कायरन पोलार्डने विक्रमी कामगिरी करत इतिहास रचला.
पोलार्डने 31 चेंडूंमध्ये नाबाद 44 धावांची झटपट खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार आणि पाच षटकार ठोकले. विशेषतः 15वे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले. वकार सलामखेलच्या त्या षटकात पोलार्डने चार षटकार, एक चौकार आणि एक दुहेरी धाव घेत एकूण 30 धावा वसूल करत सामन्याचे पारडे एमआयच्या बाजूने झुकवले.
या सामन्यात पोलार्डने टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 300 षटकार पूर्ण करत जागतिक विक्रम केला. हा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी फाफ डू प्लेसिस, एमएस धोनी आणि रोहित शर्मा या खेळाडू या टप्प्याजवळ पोहोचले होते. पोलार्डने वेस्ट इंडिज, मुंबई इंडियन्ससह अनेक फ्रँचायझींना नेतृत्व दिले असून त्याची ही कामगिरी टी20 क्रिकेटमधील ऐतिहासिक ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.