FC Goa coach Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: '..आम्हाला झगडावे लागेल', ओडिशा विरुद्धच्या सामन्यांनंतर प्रशिक्षक मार्केझ यांची प्रतिक्रिया; आक्रमक खेळाचे केले कौतुक

Manolo Marquez: ओडिशा एफसीविरुद्धच्या विजयी लढतीत आपल्या संघाने उत्तरार्धात लय गमावल्याचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मान्य केले.

Sameer Panditrao

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शिल्ड स्वतःपाशीच राखण्याच्या दृष्टीने मोहन बागानने कूच करताना जवळच्या प्रतिस्पर्धी संघावर कोलकत्याच्या संघाने दहा गुणांची आघाडी मिळविली. आता एफसी गोवाने स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर लक्ष एकवटले आहे.

ओडिशा एफसीविरुद्धच्या विजयी लढतीत आपल्या संघाने उत्तरार्धात लय गमावल्याचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मान्य केले. फातोर्डा येथे गुरुवारी रात्री एफसी गोवाने दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या ओडिशा एफसीला २-१ असे हरविले.

सध्या आयएसएल स्पर्धेत अव्वल असलेल्या मोहन बागानचे ४६, दुसऱ्या स्थानावरील एफसी गोवाचे ३६ गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचे ३४ गुण झाले आहेत. ओडिशा एफसी २५ गुणांसह सातव्या क्रमांकावर असून ते प्ले-ऑफ फेरीसाठी इच्छुक आहेत.

शिल्डसंदर्भात सद्यःस्थितीवर भाष्य करताना मार्केझ म्हणाले, की "गणितीयदृष्ट्या संधी आहे, पण वास्तववादी दृष्टिकोनातून मला वाटते, की आम्हाला दुसऱ्या स्थानासाठी झगडावे लागेल. ओडिशाविरुद्ध मिळालेल्या तीन गुणांमुळे आम्ही खूप जवळ पोहोचलो आहोत. अव्वल सहा संघांत पात्र ठरणे हे पहिले लक्ष्य आहे, त्यानंतर आम्हाला आगेकूच राखावी लागेल."

मोहन बागानचा अपवाद वगळता सर्व संघ एका गुणासाठीही झगडत आहेत, याकडे मार्केझ यांनी लक्ष वेधले. एफसी गोवाच्या पुढील सामन्यांतील आव्हानांविषयी ते म्हणाले, की "ओडिशा एफसीनंतर पुढचा सामना मुंबई सिटी एफसीविरुद्ध आहे, हा संघ सहा संघांतील जागेसाठी झगडत आहे. त्यानंतर केरळ ब्लास्टर्स एफसी लढत असून ते सुद्धा सहा संघांत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, नंतर पंजाब एफसी असून हा संघही सहा संघात येण्यासाठी संघर्षरत आहे. मला वाटते प्रत्येक संघासाठी शेवटपर्यंत खूप कठीण परिस्थिती आहे."

ओडिशाच्या आक्रमक खेळाचे कौतुक

सामन्यानंतर मार्केझ यांनी ओडिशाच्या आक्रमक खेळाचे कौतुक केले. स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले, की ``माझ्या मते, पूर्वार्धात आम्ही चांगला खेळ केला. उत्तरार्धात लाल कार्ड नसते तर एफसी गोवाने सामना जिंकला असता का, हे मला माहीत नाही. ते खूप चांगले खेळत होते. आम्ही खेळावरचा पूर्णपणे ताबा गमावला होता. त्यांना गुणांची गरज असल्याने त्यांनी धोका पत्करला. त्यांनी खूप हिंमत दाखविली. मला वाटते, की आम्ही या दरम्यान खूप अस्वस्थ होतो आणि त्यामुळे खेळावर ताबा राखू शकलो नाही.`` अगोदरच्या लढतीतील रेड कार्ड निलंबनामुळे ओडिशाचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा या सामन्यात संघाच्या बाकड्यावर नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT