Kerala Defeated Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Santosh Trophy: चुरशीच्या लढतीत गोवा हारला! केरळने मारली बाजी; नोंदवला निसटता विजय

Kerala Defeated Goa: गतउपविजेत्या गोव्याला ७८व्या संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर पुरुष फुटबॉल स्पर्धेत रविवारी सलामीच्या लढतीत निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गतउपविजेत्या गोव्याला ७८व्या संतोष करंडक राष्ट्रीय सीनियर पुरुष फुटबॉल स्पर्धेत रविवारी सलामीच्या लढतीत निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. हैदराबाद येथील डेक्कन अरेनावर ‘ब’ गटातील चुरशीच्या लढतीत त्यांना केरळने ४-३ फरकाने हरविले.

सामन्यात माजी विजेत्या गोव्याची सुरवात आश्वासक होती. दुसऱ्याच मिनिटात नायजेल फर्नांडिस याने गोव्याला आघाडी मिळवून दिली. केरळने (Kerala) नंतर जोरदार मुसंडी मारत ३३ मिनिटांच्या खेळात ३-१ असे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्यासाठी १६व्या मिनिटास मुहम्मद रियास याने, २७व्या मिनिटास मुहम्मद अजसाल याने, तर ३३ व्या मिनिटास नसीब रहमान याने गोल केला. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर केरळने आणखी एक गोल केला. ६९ व्या मिनिटात ख्रिस्ती डेव्हिस याने अचूक नेम साधल्यामुळे केरळची स्थिती आणखी बळकट झाली.

सामन्यातील अखेरची १२ मिनिटे शिल्लक असताना गोव्याने (Goa) जोरदार प्रतिकार केला. शुबर्ट परेरा याच्या दोन गोलमुळे गोव्याला पिछाडी ३-४ अशी कमी करता आली. शुबर्ट याने अनुक्रमे ७८ व ८६ व्या मिनिटात प्रत्येकी एक गोल केला. तो सामन्याच्या ४१ व्या मिनिटात बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरला होता. गोव्याने नंतर बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण त्यांना सफलता मिळाली नाही. गोव्याचा ब गटातील पुढील सामना १७ डिसेंबर रोजी ओडिशाविरुद्ध खेळला जाईल. या गटात रविवारी झालेल्या अन्य एका सामन्यात तमिळनाडू व मेघालय यांच्यात २-२ अशी गोलबरोबरी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT