ISL 2026 FC Goa vs Bengaluru FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

ISL 2026 FC Goa vs Bengaluru FC: अनुभवी आघाडीपटू सुनील छेत्री आणि बदली खेळाडू नामग्याल भुतिया यांनी नोंदविलेल्या अप्रतिम गोलमुळे बंगळूर एफसीने २-० असा सफाईदार विजय नोंदविला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अनुभवी आघाडीपटू सुनील छेत्री आणि बदली खेळाडू नामग्याल भुतिया यांनी नोंदविलेल्या अप्रतिम गोलमुळे बंगळूर एफसीने २-० असा सफाईदार विजय नोंदविला. या निकालाने एफसी गोवाची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील यावेळची अपराजित मालिका खंडित केली. सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

४१ वर्षीय सुनील छेत्रीने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास एफसी गोवाचा बचाव बेसावध असल्याची संधी नेमकी साधली. यावेळी एफसी गोवाचा गोलरक्षक ऋतिक तिवारी याने झेपावत चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सफलता लाभली नाही.

त्यानंतर ३६व्या मिनिटास कॉर्नर फटक्यावर पोल मोरेनो याचा ताकदीचा फटका गोलपोस्टला आपटल्यामुळे एफसी गोवाला बरोबरी साधणे शक्य झाले नाही. ९०+२ व्या मिनिटास बदली खेळाडू नामग्याल भुतिया याने अगदी जवळून वेगवान फटक्यावर बंगळूर एफसीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या गोलची नोंद केली. फातोर्डा येथे एफसी गोवाविरुद्ध चार लढतीनंतर बंगळूर एफसीने अखेर विजयाची नोंद केली.

स्पर्धेतील अगोदरच्या सहा सामन्यांत दोन विजय व चार बरोबरी या कामगिरीसह अपराजित असलेल्या एफसी गोवास पहिला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे सात लढतीनंतर १० गुण कायम राहिले, तसेच सातव्या क्रमांकावर राहावे लागले.

बंगळूर एफसीने चौथ्या विजयाची नोंद केली. मुंबई सिटी, मोहन बागान, जमशेदपूर एफसी व बंगळूर एफसीचे समान १४ गुण झाले आहेत. स्पर्धेतील आणखी एका लढतीत शनिवारी मोहन बागानला जमशेदपूर एफसीने १-१ असे गोलबरोबरीत रोखले.

जमशेदपूर येथे लिस्टन कुलासो याने १५व्या मिनिटास मोहन बागानसाठी गोल केल्यानंतर ९०+५ व्या मिनिटास ऋत्विक दास याने जमशेदपूर एफसीला बरोबरी साधून दिली.एफसी गोवाचा स्पर्धेतील पुढील सामना १० एप्रिल रोजी फातोर्डा येथेच ओडिशा एफसीविरुद्ध होईल.

बारा लढतीनंतर अखेर पराभव

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सलग १२ आयएसएल लढती अपराजित राहिल्यानंतर एफसी गोवाचा पहिला पराभव

१९ ऑक्टोबर २०२४ रोजी आयएसएल स्पर्धेत मुंबई सिटीविरुद्ध १-२ असा पराभव पत्करल्यानंतर एफसी गोवाचे फातोर्ड्यात १० विजय व २ बरोबरी

२०२४-२५ मधील १० लढतीत ९ विजय, १ बरोबरी, तर २०२५-२६ मध्ये बंगळूरविरुद्धच्या पराभवापूर्वी १ विजय व १ बरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

SCROLL FOR NEXT