IPL 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

IPL 2026: आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा मिनी लिलाव मंगळवारी अबुधाबी येथे झाला. देश-विदेशातील मिळून साडेतीनशे खेळाडू लिलावात होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा मिनी लिलाव मंगळवारी अबुधाबी येथे झाला. देश-विदेशातील मिळून साडेतीनशे खेळाडू लिलावात होते. त्यात तिघेजण गोव्याच्या संघातील होते; पण त्यांना कोणत्याही फ्रँचायजीने पसंती दिली नाही, साहजिकच ते अनसोल्ड राहिले.

लिलालासाठी सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व पाहुणा खेळाडू ललित यादव या गोव्याच्या तिघा खेळाडूंची नोंदणी झाली होती. त्यापैकी अभिनव तेजराणा याचे नाव लिलावाच्या पहिल्या फेरीत पुकारले गेले; पण त्याच्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. सुयश प्रभुदेसाई व ललित यादव यांचे नाव लिलाव प्रक्रियेत अखेरपर्यंत आलेच नाही.

सुयश प्रभुदेसाई २०२२ ते २०२४ या कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरतर्फे आयपीएल सामने खेळला होता. २०२५ मध्ये गोव्याचा एकही क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत नव्हता. आता २०२६ मध्येही गोव्याच्या संघातील खेळाडू आयपीएलमध्ये नसतील ही बाब मंगळवारच्या मिनी लिलावानंतर स्पष्ट झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT