Ameya Audi Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess: अमेय अवदीची ‘आंतरराष्ट्रीय’ छाप; दोन बुद्धिबळ स्पर्धांत संयुक्त प्रथम स्थान

IM Ameya Audi: भारतीय इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने चेक प्रजासत्ताकात झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भारतीय इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने चेक प्रजासत्ताकात झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडली. गोमंतकीय खेळाडूने चेक ओपन पार्दुबिचे - अ स्पर्धेत, तसेच साचोव्ही फेस्टिव्हल चेस्के बुदेयोविचे आयएम स्पर्धेत संयुक्त पहिला क्रमांक मिळविला.

पार्दुबिस ओपन स्पर्धेत अमेयला २४वे मानांकन होते. नऊ फेऱ्यांच्या स्पर्धेत त्याने अपराजित राहताना साडेसात गुणांची कमाई केली. यामध्ये सहा विजय व तीन बरोबरींचा समावेश होता.

प्रमुख खेळाडूंत अव्वल मानांकित रुमानियन ग्रँडमास्टर लिव्हियू निसिपेयानू, इस्त्राईलचा ग्रँडमास्टर एव्हजेनी झानान, चेकची वूमन इंटरनॅशनल मास्टर पेत्रा सोचोरोवा यांना बरोबरीत रोखले. अमेय व चेक प्रजासत्ताकाचा आयएम व्हाक्लाव फिनेक यांचे समान साडेसात गुण झाले. टायब्रेकर गुणांत व्हाक्लाव याला विजेतेपद, तर अमेयला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेत ३७ देशांतील १९९ खेळाडू सहभागी झाले होते, त्यात १०७ खेळाडू मानांकित होते.

त्यापूर्वी झालेल्या साचोव्ही फेस्टिव्हल स्पर्धेतही अमेयने अपराजित धडाका राखला. नऊ फेऱ्यांतून त्याने सहा गुणांची कमाई केली. या स्पर्धेत युक्रेनचा आयएम येव्हजेनी रोश्का याचेही सहा गुण झाले. टायब्रेकर गुणांत पुन्हा अमेय उपविजेता ठरला, तर येव्हजेनी विजेता ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT