Inter Kashi I League Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Inter Kashi I League Trophy: आय-लीग ‘ट्रॉफी’चा घोळ संपेना! इंटर काशीला नवीन करंडक प्रदान; चर्चिल ब्रदर्सचा संताप

I League Trophy Controversy: गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने मूळ करंडक दिला नाही, त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) विजेते घोषित केलेल्या इंटर काशी एफसीला नवीन करंडक देऊन गौरविले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गतमोसमातील आय-लीग फुटबॉल करंडक प्रदान करण्यावरून पुन्हा एकदा शनिवारी वाद निर्माण झाला. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाने मूळ करंडक दिला नाही, त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) विजेते घोषित केलेल्या इंटर काशी एफसीला नवीन करंडक देऊन गौरविले.

सध्य गोव्यात सुपर कप स्पर्धा सुरू आहे. इंटर काशी एफसीचा ब गटातील अखेरचा सामना शनिवारी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर जमशेदपूर एफसीविरुद्ध झाला. शनिवारी संध्याकाळी या लढतीनंतर महासंघातर्फे आय-लीग विजेते या नात्याने इंटर काशी संघाला करंडक देण्यात आला. एआयएफएफ उपसचिव एम. सत्यनारायणन, गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांच्या हस्ते इंटर काशी संघाला करंडक प्रदान करण्यात आला.

गेल्या एप्रिलमध्ये अगोदर आय-लीग विजेते या नात्याने चर्चिल ब्रदर्सला करंडक व खेळाडूंना पदके देण्यात आली होती. शनिवारी पुन्हा नव्या समारंभ झाला.

ऑक्टोबरच्या सुरवातीस एआयएफएफने इंटर काशीला अधिकृतपणे आय-लीग विजेते घोषित करून इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील त्यांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब केले होते. एआयएफएफने इंटर काशी एफसीला आय-लीग २०२४-२५ मधील विजेते घोषित करावे असा आदेश १८ जुलै रोजी क्रीडा लवादाने (सीएएस) दिला होता. त्यानुसार, अगोदर विजेता घोषित केलेल्या चर्चिल ब्रदर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

चर्चिल ब्रदर्सचा संताप

इंटर काशी एफसीला नवीन आय-लीग करंडक देण्यावरून चर्चिल ब्रदर्स संघाने मात्र महासंघावर तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात चर्चिल ब्रदर्सने प्रमुख चर्चिल आलेमाव यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट केले, की स्वित्झर्लंडस्थित क्रीडा लवादाने (सीएएस) तात्पुरत्या आदेशात इंटर काशी एफसीला विजेता घोषित केले, परंतु चर्चिल ब्रदर्सला करंडक परत करण्याचे आदेश आजपर्यंत दिलेले नाहीत. अंतिम निर्णय अद्याप बाकी असून, तो आल्यानंतर स्विस फेडरल ट्रिब्युनलमध्ये आव्हान देणार आहोत.

चर्चिल ब्रदर्स क्लबने निवेदनात म्हटले आहे की, “इंटर काशी एफसीच्या एका खेळाडूविरुद्ध नियमभंगाची चौकशी प्रलंबित असून, तिची सुनावणीही निश्चित झाली नव्हती. त्यामुळे आम्ही एआयएफएफच्या अपिल्स कमिटीकडे आणि दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. यानंतर एआयएफएफ अपिल्स कमिटी आणि दिल्ली उच्च न्यायालयाने चर्चिल ब्रदर्सच्या बाजूने निर्णय देत करंडक प्रदान करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार २७ एप्रिल २०२५ रोजी गोव्यात झालेल्या समारंभात एआयएफएफने चर्चिल ब्रदर्स एफसी, गोवा यांना अधिकृतरीत्या आय-लीग २०२४-२५ करंडक आणि विजेत्यांची पदके प्रदान केली.” या सर्व गोष्टींची एआयएफएफला माहिती असूनही, शनिवारी गोव्यात इंटर काशी एफसीच्या सामन्यानंतर त्यांना करंडक देण्याचा त्यांचा विचार समजण्यास कठीण आहे. आम्ही दिलेल्या कायदेशीर पत्रांना एआयएफएफकडून उत्तरही आलेले नाही. त्यामुळे कोणता करंडक देणार असा सवाल चर्चिल यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT