Goa Football News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: ‘लीग शिल्ड’ विजेत्या मोहन बागानची एफसी गोवावर मात! बोरिस सिंगचा स्वयंगोल; मार्केझ यांचा संघ प्रथमच गोलविना

FC Goa Vs Mohun Bagan: एफसी गोवाच्या बोरिस सिंगच्या स्वयंगोलमुळे मोहन बागानने ६२व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

गोमन्तक डिजिटल टीम

ISL 2024-25 FC Goa Vs Mohun Bagan

पणजी: एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील २०२४-२५ मोसमात सलग २३ सामन्यांत गोल केल्यानंतर शनिवारी प्रथमच गोल नोंदवू शकला नाही. ‘लीग शिल्ड’ विजेत्या मोहन बागानने प्रतिस्पर्ध्यांच्या त्रुटींचा लाभ उठवत कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर २-० फरकाने बाजी मारली.

एफसी गोवाच्या बोरिस सिंगच्या स्वयंगोलमुळे मोहन बागानने ६२व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. सहकारी गोलरक्षक ऋतिक तिवारी जाग्यावर नाही ही बाब बोरिसच्या ध्यानात आली नाही, त्याने गोलनेटच्या दिशेने केलेले हेडिंग गोलमध्ये रुपांतरीत झाले.

नंतर ९०+४ व्या मिनिटास प्रतिस्पर्धी खेळाडूस टॅकल करण्याच्या नादात एफसी गोवाचा अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याने चेंडूवरील ताबा गमावला आणि ग्रेग स्टीवर्ट याने मोहन बागानच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

मोहन बागानचा हा २४ सामन्यांतील १७ वा विजय ठरला. ५६ गुणांसह त्यांचे अग्रस्थान निर्विवाद ठरले. सलग पाच सामने जिंकल्यानंतर एफसी गोवा संघ पराभूत झाला. एकंदरीत त्यांचा हा चौथा पराभव असून २४ लढतीतून ४८ गुणांसह ते द्वितीय स्थानी कायम राहिले. दोन्ही संघ आयएसएल करंडकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT