Indian Super League 2024 25  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: 'एफसी गोवा'चा जल्लोष! अपराजित बंगळूरला रोखले; आता मिशन 'पंजाब'

FC Goa: एफसी गोवाने मागील चुकांची पुनरावृत्ती टाळत शनिवारी अतिशय प्रभावी खेळासह विजयी ‘दिवाळी’ साजरी केली. त्यासह बंगळूर एफसीची अपराजित घोडदौडही खंडित केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024 25 FC Goa VS Bangalore

पणजी: एफसी गोवाने मागील चुकांची पुनरावृत्ती टाळत शनिवारी अतिशय प्रभावी खेळासह विजयी ‘दिवाळी’ साजरी केली. त्यासह बंगळूर एफसीची अपराजित घोडदौडही खंडित केली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले.

अल्बानियन आर्मांदो सादिकू याने ६३व्या मिनिटास केलेला गोल, बदली खेळाडू ब्रायसन फर्नांडिस याने ७२व्या मिनिटास ‘फर्स्ट टच’वर साधलेली संधी, तसेच सर्बियन देयान द्राझिच याने ९०+३ व्या मिनिटास केलेला गोल याबळावर एफसी गोवाने मोसमात प्रथमच क्लीन शीट राखत विजयाचा जल्लोष केला.

यापूर्वी पाच विजय व एक बरोबरी या कामगिरीमुळे अपराजित असलेल्या गेरार्ड झारागोझा यांच्या मार्गदर्शनाखालील आणि सुनील छेत्री याचा समावेश असलेल्या बंगळूर एफसीला यंदा स्पर्धेतील पहिलाच पराभव पत्करावा लागला. सात लढतीनंतर बंगळूरचे १६ गुण व अग्रस्थान कायम राहिले. एफसी गोवाचा हा सात सामन्यांतील दुसरा विजय ठरला. अन्य तीन बरोबरी व दोन पराभव यासह त्यांनी आता नऊ गुणांसह पाचव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. त्यांचा पुढील सामना फातोर्डा येथेच सहा नोव्हेंबरला पंजाब एफसीविरुद्ध होईल.

तासाभराच्या खेळानंतर वेगवान महंमद यासीरच्या अप्रतिम क्रॉसपासवर सादिकूने यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. नऊ मिनिटानंतर बंगळूरचा अनुभवी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याची चूक एफसी गोवाच्या पथ्यावर पडली. त्याच्या गलथान पासचा लाभ उठवत सादिकूने ब्रायसनकडे चेंडू सोपविला.

या गुणवान मध्यरक्षकाने प्रतिस्पर्धी गोलरक्षक जाग्यावर नसल्याची संधी दूरवरील फटक्यावर अचूक हेरली. विशेष म्हणजे मिनिटापूर्वीच त्याने मैदानावर महंमद यासीर याची जागा घेतली होती. सामन्याच्या भरपाई वेळेत आणखी एक बदली खेळाडू इकेर ग्वॉर्रोचेना याच्या असिस्टवर द्राझिच याने यजमान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

संदेशचे नऊ महिन्यानंतर ‘क्लीन शीट’ पुनरागमन

हुकमी बचावपटू भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू संदेश झिंगन याने दीर्घकाळानंतर दुखापतीवर मात करत यंदाच्या आयएसएल मोसमात पुनरागमन केले. तो तब्बल नऊ महिन्यानंतर स्पर्धात्मक सामना खेळला. चपळ मध्यरक्षक महंमद यासीर सुद्धा दुखापतीतून सावरत संघात दाखल झाला. ह्रतीक तिवारी याला प्रथमच गोलरक्षणाची संधी मिळाली. हे बदल एफसी गोवासाठी सकारात्मक ठरले. मोसमातील सलग सहा सामन्यांत गोल स्वीकारल्यानंतर मानोलो मार्केझ यांनी प्रथमच क्लीन शीट राखण्याचा पराक्रम साधला.

दृष्टिक्षेपात सामना

फातोर्ड्यात अगोदरच्या लढतीत १ बरोबरी व २ पराभव स्वीकारल्यानंतर एफसी गोवाचा यंदा पहिला विजय

आर्मांदो सादिकूचे आता ६ लढतीत ७ गोल, नॉर्थईस्टच्या अलाएद्दीन अजारेई याच्याशी बरोबरी

बंगळूर एफसीविरुद्ध १६ लढतीत एफसी गोवाचे आता ५ विजय

घरच्या मैदानावर एफसी गोवाचे बंगळूरविरुद्ध ८ सामन्यांत ४ विजय

फातोर्ड्यात एफसी गोवा बंगळूरविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात विजयी, गतमोसमात २-१ अशी बाजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT