Footbal I League 2024 X
गोंयचें खेळामळ

I League Football: आय-लीग स्पर्धेत रंगणार चर्चिल विरुद्ध नामधारी एफसी सामना; आफ्रिकन 'लेके'च्या कामगिरीवर राहणार लक्ष

Churchill Brothers Vs Namdhari FC: दिमित्रिस दिमित्रिओ यांच्या मार्गदर्शनाखालील चर्चिल ब्रदर्सने स्पर्धेत सहापैकी चार सामने जिंकले असून राय मैदानावरच मागील लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबला दोन गोलने हरविले होते.

Sameer Panditrao

I League Football Churchill Brothers Vs Namdhari FC

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सध्या अव्वल स्थानी असलेल्या गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाची लढत बुधवारी (ता. ८) नामधारी एफसीविरुद्ध होईल. सामना सासष्टीतील राय पंचायत मैदानावर खेळला जाईल.

दिमित्रिस दिमित्रिओ यांच्या मार्गदर्शनाखालील चर्चिल ब्रदर्सने स्पर्धेत सहापैकी चार सामने जिंकले असून राय मैदानावरच मागील लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबला दोन गोलने हरविले होते. नामधारी एफसीचे सहा सामन्यांतून आठ गुण झाले असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. मागील लढतीत त्यांनी स्पोर्टिंग क्लब बंगळूरला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

चर्चिल ब्रदर्स संघाने संघातील दोन परदेशी खेळाडू कर्टिस ग्युथरी व हुआन मेरा यांना मुक्त केले असून आयव्हरी कोस्टचा ग्नोहेरे क्रिझो याला करारबद्ध केले आहे. आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सने ओळीने चार सामने जिंकले असून त्यांचा दक्षिण आफ्रिकन आघाडीपटू वेड लेके याने पाच गोल नोंदविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT