Goa Kabaddi Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Level Kabaddi: जल्लोष! गोव्याच्या कबड्डी संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश

National level youth kabaddi series 2024: गोव्याच्या वास्को व्हायपर्स कबड्डी संघाने राष्ट्रीय पातळीवरील युवा कबड्डी सीरिज स्पर्धेच्या तृतीय विभागात दिमाखादार खेळ करत विजेतेपदाला गवसणी घातली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या वास्को व्हायपर्स कबड्डी संघाने राष्ट्रीय पातळीवरील युवा कबड्डी सीरिज स्पर्धेच्या तृतीय विभागात दिमाखादार खेळ करत विजेतेपदाला गवसणी घातली, तसेच एक लाख रुपयांच्या धनादेशासह स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठीही पात्रता मिळविली. स्पर्धेचा पहिला टप्पा शनिवारी तमिळनाडूतील कोईंबतूर येथे संपला.

अंतिम सामना रंगतदार ठरला. वास्को व्हायपर्स संघाने बाजी मारताना हिमालयन ताहर्स संघाला ३४-३० असे चार गुणांच्या फरकाने हरविले. ते आता जानेवारी महिन्यात होणाऱ्या स्पर्धेच्या पुढील टप्प्यात खेळणार आहेत.

वास्को व्हायपर्स संघाचे मालक दत्ताराम कामत यांनी खेळाडूंचे कौतुक करून स्पर्धेतील एकंदरीत कामगिरीवर आनंद व्यक्त केला. या शानदार कामगिरीने राज्यातील इतर युवा कबड्डीपटूंनाही प्रेरणा मिळेल आणि अधिकाधिक खेळाडू कबड्डीकडे वळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्ष रुक्मिणी कामत, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीही संघाने अभिनंदन केले आहे.

गोव्याचा संघ ः सचिन, प्रिन्स दहिया, अभिषेक, जय हिंद, गौरव, भार्गव मांद्रेकर (कर्णधार), गगन पिनाम, लक्ष्मण गावडा, अली अहमद गौंडी, आशिष वेळीप, आकाश कमल, सुरेश हडपड, परशुराम बाराकर, सुमीत पांडे, राखीव ः प्रियांशू लथवाल, कार्तिक राव, चंद्रकांत घाडी, संकल्प गाड, नवीन गौडर, अनीश गाड. प्रशिक्षक ः जगदीप राजवीर, संघ व्यवस्थापक ः वेदांग कुडके.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

Crime News: निर्वस्त्र, सडलेल्या अवस्थेत आढळला 20 वर्षीय तरूणीचा मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

Best Cruiser Bike: स्वस्तात 'दमदार' क्रूझर! Harley-Davidson आणि Royal Enfield मध्ये बेस्ट बाईक कोणती? फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Video: वय 50, एका स्टाईलवर लाखो मुली फिदा, तरीही अक्षय खन्ना एकटा; म्हणाला, 'बायकोची जबाबदारी घेण्यापेक्षा...'

SDMA Advisory: 25 बळींच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार सतर्क; नाईट क्लब्स, बार्स, रेस्टॉरंट्ससाठी 'गाइडलाइन्स' जारी

SCROLL FOR NEXT