Ethan Vaz Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

एथन वाझची 'सुवर्ण भरारी'; श्रीलंकेतील राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत जिंकले दुसरे सुवर्णपदक

Ethan Vaz: एथनचे राष्ट्रकुल बुद्धिबळातील दुसरे सुवर्णपदक; गोव्याचा आठवा आयएम बुद्धिबळपटू

गोमन्तक डिजिटल टीम

 Commonwealth Chess Championships 2024

पणजी: गोमंतकीय बुद्धिबळातील ‘वंडर बॉय’ एथन वाझ याने श्रीलंकेत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सबज्युनियर (१६ वर्षांखालील) खुल्या गटात तो अव्वल ठरला.

एथनचे हे राष्ट्रकुल बुद्धिबळातील दुसरे सुवर्णपदक आहे. वयाच्या ११ व्या वर्षी त्याने दोन वर्षांपूर्वी १२ वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावले होते.

यंदा एथन वाझ हा १४ वर्षांखालील वयोगटात खेळण्यास पात्र होता; पण या १३ वर्षीय हरहुन्नरी बुद्धिबळपटूने १६ वर्षांखालील वयोगटात अनुभवी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याचे ठरविले आणि त्यात तो सफल ठरला.

वाढदिवसाची छान भेट

तीन सप्टेंबर रोजी एथनने १३ वा वाढदिवस साजरा केला. दोन दिवसांनंतर गुरुवारी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याच्यासाठी ही वाढदिवसाची छान भेट ठरली.

गोव्याचा सर्वांत युवा ‘आयएम’

यावर्षी जानेवारीच्या प्रारंभी एथन गोव्याचा बुद्धिबळातील सर्वांत युवा आयएम (इंटरनॅशनल मास्टर) बनला. १२ वर्षे आणि ४ महिन्यांचा असताना त्याने बुडापेस्ट-हंगेरी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आयएम किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म प्राप्त केला. एकंदरित तो गोव्याचा आठवा आयएम बुद्धिबळपटू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT