Pralhad Panda Boxing ,Damu Naik Boxing Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Boxing: गोव्याच्या प्रल्हाद पांडाचा विक्रम! ‘फिदरवेट बेल्ट’ राखला अबाधित; दामू नाईकांच्या बॉक्सिंग 'प्रॅक्टिस'ची चर्चा जोरात

Pralhad Panda Featherweight Belt: याच स्पर्धेत गोव्याचा आणखी एक बॉक्सर चिंबल येथील ३० वर्षीय कैलास गावस याने सुपर फ्लायवेट गटात विरार-मुंबई येथील प्रतिस्पर्धी २२ वर्षीय प्रसाद कटनूर याला नमविले.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचा व्यावसायिक बॉक्सर प्रल्हाद पांडा याने इंडियन बॉक्सिंग काऊंसिलच्या पश्चिम विभागीय बॉक्सिंगमध्ये फिदरवेट किताबाचा बेल्ट अबाधित राखला, यासह तो असा पराक्रम बजावणारा पहिला गोमंतकीय बॉक्सर ठरला.

याच स्पर्धेत गोव्याचा आणखी एक बॉक्सर चिंबल येथील ३० वर्षीय कैलास गावस याने सुपर फ्लायवेट गटात विरार-मुंबई येथील प्रतिस्पर्धी २२ वर्षीय प्रसाद कटनूर याला नमविले. सहा फेऱ्यांच्या या लढतीत पंचमंडळाच्या विभाजित निर्णायवर कैलासने बाजी मारली. सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट-३ स्पर्धा मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस संकुलात झाली. स्पर्धेत एकूण १२ बॉक्सर उतरले होते.

फिदरवेट गटातील लक्षवेधी लढतीत बस्तोडा येथील २९ वर्षीय प्रल्हादने आव्हानवीर पुण्यातील २७ वर्षीय अमित कुमार याला आठ फेऱ्यांच्या आव्हानात्मक लढतीत नमविले. रंगतदार लढतीत पंचमंडळाचा एकमताने झालेला निवाडा निर्णायक ठरला. ``घरच्या मैदानावरील बॉक्सिंग रिंगमध्ये अबाधित राखलेला किताब माझ्यासाठी खूपच खास आहे.

गेल्या कित्येक वर्षांची अथक मेहनत आणि प्रशिक्षणाच्या बळावर रिंगमध्ये पुनरागमन साधले. गोमंतकीयांच्या साक्षीने मिळविलेला हा विजय अधिक अविस्मरणीय आहे,`` असे प्रल्हादने किताब जिंकल्यानंतर सांगितले. विजयाचे श्रेय त्याने आपले संघ सहकारी आणि प्रशिक्षकांनाही दिले.

अन्य एका लढतीत बर्नाला-पंजाब येथील २२ वर्षीय मनिंदर सिंग याने पुदुचेरीचा ३० वर्षीय भरणी वेलमुरुगन याला अवघ्या २.५६ मिनिटांतच पाणी पाजले आणि वेल्टरवेट गटात विजय संपादन केला. हेवीवेट गटात आशिष अहलावत याने मुंबईचा, पण मूळ अफगाणिस्तानचा ३० वर्षीय ताहेर खुरम याला विभाजित निर्णयाद्वारे नमविले. महिलांच्या लाईट फ्लायवेट गटात २५ वर्षीय अमृता काळे (पुणे) हिने चेन्नईच्या १९ वर्षीय सान्वी गांधी हिला नमविले.

दामू नाईक यांचे बॉक्सिंग!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट-३ स्पर्धेला उपस्थित होते. त्यांनी हौस या नात्याने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरून प्रतिकात्मक बॉक्सिंगचा आनंद लुटला. यावेळी स्पर्धा घेणाऱ्या आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. सुसेगादो स्ट्राईकचे सहसंस्थापक लुईगसन फर्नांडिस, प्रथमेश नाईक, क्लाईड लोबो, आयबीसीचे पश्चिम विभागीय आयुक्त अजय साळवी यांची उपस्थिती होती. दामू नाईक यांच्या हस्ते जागतिक पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणारा लॉईड फर्नांडिस याला गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT