Goa Women's Senior Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

T20 Cricket Tournament: गोव्याच्या धाकड खूप लढल्या, मिझोरामला चारली पराभवाची धूळ; 92 धावांनी नोंदवला दणदणीत विजय!

Goa Women's Senior Team: गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड राखताना शुक्रवारी अ गटात मिझोरामवर 92 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

Manish Jadhav

गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड राखताना शुक्रवारी अ गटात मिझोरामवर 92 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. सामना बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर झाला.

गोव्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 149 धावा केल्या. कर्णधार संजुला नाईक आणि श्रेया परब यांनी संघाला 75 धावांची भक्कम सलामी दिली. दोघींनीही आक्रमक फलंदाजी केली. संजुलाने 60 चेंडूंत आठ चौकारांसह 68 धावा केल्या, तर श्रेया हिने 35 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 41 धावा नोंदविल्या. उत्तरादाखल गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीसमोर मिझोरामला 9 बाद 57 धावाच करता आल्या. गोव्याने स्पर्धेतील पहिल्या लढतीत जम्मू-काश्मीरला आठ विकेट राखून हरविले होते. त्यांचा पुढील सामना 20 रोजी मुंबईविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा: 20 षटकांत 5 बाद 149 (संजुला नाईक 68, श्रेया परब 41, पूर्वजा वेर्लेकर 16, तरन्नुम पठाण 12, शिखा पांडे 0, तेजस्विनी दुर्गड नाबाद 9, प्रीती यादव नाबाद 1, मामी 2-0-22-2) वि. वि. मिझोराम: 20 षटकांत 9 बाद 57 (तरंग झा नाबाद 19, शिखा पांडे 4-1-9-1, तरन्नुम पठाण 4-0-17-3, प्रीती यादव 4-1-7-1, सुनंदा येत्रेकर 4-1-10-1, पूर्वा भाईडकर 4-0-13-2).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT