Goa Cricket  Canva
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: दमदार सलामीनंतर गोव्याची घसरगुंडी; 48 धावांत गमावले चार फलंदाज

Goa Vs Nagaland: नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गोव्याला सुयश व रोहन कदम (२९) यांनी गोव्याला ५७ धावांची दमदार सलामी दिली.

Sameer Panditrao

पणजी: धावपर्वत उभारण्याच्या हेतूने गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण नागालँडच्या गोलंदाजांनी लगाम खेचल्यामुळे रणजी करंडक प्लेट विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढती पहिल्या दिवसअखेर ७ बाद २५८ अशी स्थिती झाली.

गोव्यातर्फे सुयश प्रभुदेसाई (५६), स्नेहल कवठणकर (६३) व कश्यप बखले (नाबाद ६८) यांनी अर्धशतके ठोकली. नागालँडमधील सोविमा येथे गुरुवारपासून पाच दिवसीय अंतिम लढतीस सुरवात झाली. दिवसाच्या अखेरच्या सत्रात जम बसलेल्या स्नेहल याच्यासह गोव्याने चार फलंदाज ४८ धावांत गमावले, त्यामुळे पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून नागालँडवर दबाव टाकण्याची योजना फोल ठरली.

नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गोव्याला सुयश व रोहन कदम (२९) यांनी गोव्याला ५७ धावांची दमदार सलामी दिली. रोहन व के. व्ही. सिद्धार्थ (१) तीन धावांच्या अंतराने बाद झाल्यामुळे गोव्याची २ बाद ६० अशी स्थिती झाली.

उपाहाराला गोव्याने २ बाद १०० धावा केल्या होत्या. सुयशने स्नेहलसमवेत तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. अर्धशतकानंतर लगेच सुयशला फिरकी गोलंदाज इमलीवटी लेमतूर याने पायचीत बाद केले.

अरुणाचल प्रदेशविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात नाबाद ६०६ धावांची भागीदारी केलेले त्रिशतकवीर स्नेहल व कश्यप बखले यांनी गोव्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र स्नेहलला सुचित याने स्वतःच्याच गोलंदाजीव झेलबाद केल्याने चौथ्या विकेटची ६१ धावांची भागीदारी भंगली. त्यानंतर दर्शन मिसाळ (५), समर दुभाषी (१३), मोहित रेडकर (२) यांनी नागालँडच्या फिरकी माऱ्यासमोर नांगी टाकल्यामुळे गोव्याची घसरगुंडी उडाली. अमूल्य पांड्रेकरने (८) कश्यपला साथ देत दिवसअखेर गोव्याचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

अर्जुनची दुखापत गोव्यासाठी डोकेदुखी

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सलग तिसरा मोसम गोव्यातर्फे ‘पाहुणा’ क्रिकेटपटू या नात्याने खेळत आहे. यंदा त्याच्या दुखापतींचे सत्र गोव्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. तंदुरुस्तीअभावी तो नागालँडविरुद्धची अंतिम लढत खेळू शकला नाही. याच कारणास्तव २५ वर्षीय डावखुरा अष्टपैलू गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्लेट विभागीय पहिल्या लढतीत मणिपूरविरुद्ध खेळू शकला नव्हता. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत तीन सामन्यांना मुकला होता, तर विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत अखेरचे चार सामन संघात नव्हता.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ९० षटकांत ७ बाद २५८ (रोहन कदम २९, सुयश प्रभुदेसाई ५६, के. व्ही. सिद्धार्थ १, स्नेहल कवठणकर ६३, कश्यप बखले नाबाद ६८, दर्शन मिसाळ ५, समर दुभाषी १३, मोहित रेडकर २, अमूल्य पांड्रेकर नाबाद ८, दीप बोरा १-४८, जे. सुचित ३-६४, इमलीवटी लेमतूर १-३२, राँगसेन जोनाथन १-६१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT