Goa Ranji Cricket Match  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: पणजीत रंगणार गोवा विरुद्ध नागालँड क्रिकेट सामना; १८ वर्षांनंतर बांदोडकर मैदानावर रणजी लढत

Goa Ranji Cricket: चार सामने पर्वरी येथे, तीन सामने सांगे येथे, तर एक सामना पणजी जिमखान्यावर खेळला जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

Bhausaheb Bandodkar Ground Panjim

पणजी: कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या ऐतिहासिक भाऊसाहेब बांदोडकर क्रिकेट मैदानावर तब्बल १८ वर्षांनंतर रणजी करंडक सामना खेळला जाणार आहे. २०२४-२५ मोसमात गोव्याचा संघ प्लेट गटात पाचपैकी तीन सामने घरच्या मैदानावर खेळणार असून दोन लढती पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर, तर एक लढत कांपाल येथे होईल.

गोवा व नागालँड यांच्यातील चार दिवसीय सामना २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होणार आहे. गोव्यात यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पुरुष गटात रणजी, २३ वर्षांखालील व १९ वर्षांखालील स्पर्धेतील एकूण आठ सामने होणार आहेत. त्यापैकी चार सामने पर्वरी येथे, तीन सामने सांगे येथे, तर एक सामना पणजी जिमखान्यावर खेळला जाईल. गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) राज्यातील सामना केंद्रांची यादी बीसीसीआयला पाठविली होती, त्यास बीसीसीआयने अधिकृत संकेतस्थळावरील नियोजित वेळापत्रकात मान्यता दिली आहे.

अखेरचा रणजी सामना २००६ मध्ये

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर अखेरचा रणजी सामना १७ ते २० जानेवारी २००६ या कालावधीत गोवा व हिमाचल प्रदेश यांच्यात झाला होता. तेव्हा हिमाचल प्रदेशने विजयाची नोंद केली होती. डिसेंबर २०१० पासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदान रणजी क्रिकेट सामन्यांचे नियमित केंद्र बनले. पणजी जिमखान्याची वास्तू आणि मैदान यांचे नूतनीकरण काम पूर्ण झाल्यानंतर या ऐतिहासिक ठिकाणी तीन वर्षांपूर्वी पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेट दाखल झाले. क्रिकेटसाठी पणजी जिमखाना आता अद्ययावत बनले आहे. गतमोसमात या ठिकाणी १९ वर्षांखालील वयोगटातील गोवा विरुद्ध त्रिपुरा यांच्यातील कुचबिहार करंडक सामना झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT