Goa vs Assam Match Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: गोव्याची विजयी घोडदौड! मिहीर कुडाळकरच्या फिरकीच्या जाळ्यात आसामचे फलंदाज अडकले; दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 215 धावांनी दिली मात

Goa vs Assam Match: गोव्याच्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात डावाने विजय मिळवून बोनस गुणाची कमाई केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात डावाने विजय मिळवून बोनस गुणाची कमाई केली. त्यांनी मंगळवारी आसामला डाव व २१५ धावांच्या फरकाने सहजपणे नमविले.

पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झालेला एलिट ड गट सामना तिसऱ्या दिवशी चहापानापूर्वीच संपला. गोव्याने (Goa) पहिल्या डावात ३७६ धावा केल्यानंतर कालच्या ४ बाद ४८ वरुन आसामचा पहिला डाव मंगळवारी सकाळी ८६ धावांत संपुष्टात आला. गोव्याने २९० धावांची आघाडी प्राप्त केली व त्यांनी आसामवर फॉलोऑन लादला. नंतर पाहुण्याचा संघाचा दुसरा डाव ७५ धावांतच गुंडाळला गेला.

गोव्याच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार मारा केला, त्याच फिरकी गोलंदाज गोलंदाज मिहीर कुडाळकर जास्त उल्लेखनीय ठरला. त्याने दोन्ही डावांत मिळून फक्त नऊ धावांत सात गडी (३-० व ४-९) बाद केले. आसामने दोन्ही डावांत मिळून फक्त ७६.२ षटकेच फलंदाजी केली. त्यांना गोव्याच्या गोलंदाजांचा चिवटपणे सामना करणे शक्य झाले नाही.

गोव्याला या लढतीतून बोनससह एकूण सात गुण मिळाले. त्यांचे आता दोन सामन्यांतून १४ गुण झाले आहेत. अगोदरच्या सामन्यात त्यांनी छत्तीसगडला डाव व १३ धावांनी नमविले होते. आसामला सलग दुसऱ्या लढतीत डावाच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. पूर्वीच्या सामन्यात त्यांना बंगालने डाव व १७२ धावांनी हरविले होते. लागोपाठ दोन सामने जिंकलेल्या गोव्याचा गटातील तिसरा सामना १ ते ४ डिसेंबर या कालावधीत सांगे येथे उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : ३७६

आसाम, पहिला डाव (४ बाद ४८ वरुन) : ४१.२ षटकांत सर्वबाद ८६ (दीपंकर पॉल १५, समर्थ राणे १२-३-३३-३, चिगुरुपती व्यंकट १२-५-२१-२, यश कसवणकर १४-७-२१-२, मिहीर कुडाळकर ३.२-३-०-३).

आसाम (Assam) दुसरा डाव (फॉलोऑन) : ३५ षटकांत सर्वबाद ७५ (वरुणज्योती मालाकार १७, दीपंकर पॉल नाबाद २०, चिगुरुपती व्यंकट ४-१-८-०, यश कसवणकर ९-१-१९-२, समर्थ राणे ६-१-१६-१, मिहीर कुडाळकर ६-०-९-४, शिवेन बोरकर १०-५-१८-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT