Nilesh Naik Competition Director Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

38th National Games: गोव्याचे नीलेश नाईक यांची 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संचालक म्हणून नियुक्ती

Nilesh Naik Competition Director: गोव्याचे नीलेश नाईक यांची आगामी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘स्पर्धा संचालक’ म्हणून नियुक्ती झाली आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्याचे नीलेश नाईक यांची आगामी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ‘स्पर्धा संचालक’ म्हणून नियुक्ती झाली आहे. स्पर्धा उत्तराखंडमध्ये 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत होईल.

नोडल अधिकारी

नीलेश हे भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन महासंघाचे नोडल अधिकारी असून तांत्रिक अधिकारीही आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संचालक या नात्याने नीलेश यांच्याकडे स्पर्धेतील संपूर्ण कार्यक्रमांचे एकूण नियोजन आणि संचालन असेल. स्पर्धेच्या कालावधीत उत्तराखंडमधील (Uttarakhand) हल्दवानी येथे तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती, विशिष्ट स्वयंसेवक, ठिकाण निश्चित करण्याची जबाबदारीही असेल.

दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा 8 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत हल्दवानी येथे होणार आहे. यामध्ये लेझर रन, बायथल, ट्रायथल, टेट्रॅथलॉन, पेंटॅथलॉन या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉन हा खेळ गोव्यासाठी पदक विजेता ठरलेला आहे. गोव्यात 2023 मध्ये झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने (Goa) या खेळात एक सुवर्ण, एक रौप्य व सहा ब्राँझ मिळून एकूण आठ पदके जिंकली होती. त्यावेळी नीलेश यांचे मार्गदर्शन संघासाठी मोलाचे ठरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT