Goa government sports facilities Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

राज्यातील क्रीडा सुविधांचा खासगी संस्था, संघटनांना लाभ! अर्थसंकल्पीय भाषणात निर्णय जाहीर; ‘एकलव्य’ प्रोत्साहन योजना होणार सुरु

Goa government sports facilities: नामवंत अशा क्रीडा अकादमी आणि केंद्रांत प्रशिक्षण घेणाऱ्या राज्यातील आदिवासी प्रतिभावंत क्रीडापटूंना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील उपलब्ध सरकारी क्रीडा सुविधांचा वापर आता खासगी क्रीडा संस्था आणि संघटनांना करता येईल, तसा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणातून विधानसभेत जाहीर केला.

मुख्यमंत्री म्हणाले, की ‘‘क्रीडा व युवा व्यवहार खात्यासाठी २५१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील १७६ कोटी रुपये महसुली खर्चासाठी, तर ७५ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी आरक्षित आहेत.

राज्यातील क्रीडा संस्कृतीची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी तसेच इनडोअर स्टेडियम, मैदाने यांचा योग्य वापर होण्यासाठी स्थानिक क्लबांना आणि क्रीडा संघटनांना त्यांच्या क्षेत्रातील क्रीडा सुविधांचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार आहे.’’

मडकई येथे क्रीडा संकुल, सां जुझे द आरियल येथे फुटबॉल मैदान, कुडतरी येथे व्हिलेज स्कूल मैदान, फातोर्डा येथे जॉगींग ट्रॅक, वड्डे-सांगे येथे शाळेचे क्रीडांगण, कुडका येथे मैदान आणि कुंभारजुवे येथे शालेय क्रीडांगण बांधण्याचे काम या वर्षी पूर्ण होईल. यासाठी ३३.७७ कोटी रुपये खर्च येणार आहे. विविध मैदानांच्या विकासाची कामे राज्यभरात ६१.३१ कोटी रुपये खर्चून यंदा सुरु केली जाणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

क्रीडापटूंसाठी ‘एकलव्य’ प्रोत्साहन योजना

नामवंत अशा क्रीडा अकादमी आणि केंद्रांत प्रशिक्षण घेणाऱ्या राज्यातील आदिवासी प्रतिभावंत क्रीडापटूंना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यासाठी ‘एकलव्य’ क्रीडापटू प्रोत्साहन योजना नावाची नवी योजना सुरु केली जाणार आहे. यंदा त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT