Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

Tennis ball cricket tournament: गोव्याच्या मुलींनी ३०व्या राष्ट्रीय सबज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशला चार धावांनी पराभूत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या मुलींनी ३०व्या राष्ट्रीय सबज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशला चार धावांनी पराभूत केले. मुलांच्या गटात गोव्याला संयुक्त तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धा राजस्थानमधील दौसा येथे झाली.

मुलींच्या अंतिम लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ४ बाद ३८ धावा केल्या. पूर्वा गावडे हिने १७, तर आयुषी श्रीवास्तव हिने १० धावा नोंदविल्या. उत्तरादाखल उत्तर प्रदेशला ६ षटकांत ४ बाद ३४ धावा करता आल्या.

गोव्यातर्फे पूर्वा गावडे (२-५) व तनिशा वेळीप (२-७) यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. मुलांच्या उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशने गोव्याला १४ धावांनी हरविले. उत्तर प्रदेशने ६ षटकांत २ बाद ५९ धावा केल्यानंतर गोव्याला ५ बाद ४५ धावाच करता आल्या.

गोव्यातील टेनिस बॉल क्रिकेट खेळाच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले दिवंगत मंत्री रवी नाईक यांना जिंकलेले करंडक समर्पित करत असल्याचे गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT