BCCI Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Krishna Das BCCI Selection Committee: गोव्यातर्फे एक मोसम खेळलेले आसामचे माजी वेगवान गोलंदाज कृष्णा दास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय ज्युनियर क्रिकेट निवड समितीवर नियुक्ती झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातर्फे एक मोसम खेळलेले आसामचे माजी वेगवान गोलंदाज कृष्णा दास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय ज्युनियर क्रिकेट निवड समितीवर नियुक्ती झाली आहे. कृष्णा दास यांनी २०१९-२० मोसमानंतर देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यापूर्वी २०१८-१९ मोसमात ते गोव्यातर्फे पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने खेळले होते.

या ३६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने त्या मोसमात गोव्याचे सात रणजी करंडक सामन्यात प्रतिनिधित्व केले होते. १२ डावांत त्यांनी २६ विकेट्स मिळविल्या होत्या. दोन वेळा डावात पाच विकेट्स, तर एकवेळ सामन्यात दहा विकेट्स टिपल्या होत्या. गोव्यातर्फे सामन्यात दहा गडी टिपताना कृष्णा यांनी लाहली येथे हरियानाविरुद्ध ११६ धावांत ११ गडी बाद केले, पहिल्या डावात ६-७५ व दुसऱ्या डावात ५-४१ अशी कामगिरी बजावली होती.

एकंदरीत कृष्णा दास ४९ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यांनी १६६ गडी बाद करताना ११ वेळा डावात पाच, तर चार वेळा सामन्यांत १० गडी बाद केले. आसाम व गोव्याव्यतिरिक्त त्यांनी भारताच्या १९ वर्षांखालील आणि भारत ‘अ’ संघाचेही प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर कृष्णा यांनी भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक, तसेच उत्तराखंड रणजी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही योगदान दिले.

दिल्लीचे माजी क्रिकेटपटू परविंदर अवाना यांची राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णा दास यांच्या व्यतिरिक्त राकेश पटेल (गुजरात व बडोदा) व एन. अर्जुन यादव (हैदराबाद) हे समितीचे अन्य सदस्य आहेत. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीतर्फे (सीएसी) ज्युनियर क्रिकेट समिती निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

Rahul Gandhi: राहुल गांधी गोव्यात पुन्हा येणार; भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीला भेट देणार का?

Cockroach Janata Party: 'विनाशकाले विपरीत बुद्धी!' तरुणाईच्या नव्या आंदोलनाची काँग्रेसला धास्ती?

जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT