Goa Football Association Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Football Association: फुटबॉलपटूंच्या कल्याणासाठी 'GFA' कटिबद्ध; लवकरच खेळाडू संघटना स्थापनेसाठी प्रयत्न- कायतान फर्नांडिस

GFA Players Association: जीएफए कार्यकारी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर प्रस्ताव संमत झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) राज्यातील फुटबॉलपटूंच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून लवकरच खेळाडूंची संघटना स्थापन केली जाईल, अशी माहिती जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी दिली. जीएफए कार्यकारी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर प्रस्ताव संमत झाले.

याविषयी कायतान यांनी सांगितले, की ‘‘गोव्यातील फुटबॉलमध्ये खेळाडू हेच सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे खेळाडू संघटना शक्य तितक्या लवकर स्थापन करण्यासाठी जीएफए प्रयत्नशील आहे.’’ संघटनेच्या कार्यकारी बैठकीत खेळाडू संघटना स्थापनेबाबत विचारविनिमय झाला.

संघटना स्थापनेसाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्याचा निर्णय झाला. या संघटनेमुळे खेळाडूंच्या हितासाठी अधिकृत व्यासपीठ मिळेल, तसेच राज्यातील फुटबॉल विकासात खेळाडूंचा सहभाग अधिक प्रभावीपणे होईल, असे कायतान यांनी नमूद केले.

संघटना स्थापनेसंदर्भात पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि वेळापत्रकाबाबतची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. जीएफए खेळाडू संघटनेच्या स्थापनेसाठी भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू मायमोल रॉकी, तसेच जीएफए कार्यकारिणी सदस्य संजीव नागवेणकर आणि कॉस्मे ऑलिव्हेरा यांच्यावर खेळाडूंशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जीएफए ठरणार पहिली संघटना!

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) नव्या घटनेनुसार ऑक्टोबर २०२६ पर्यंत जीएफएच्या घटनेत आवश्यक दुरुस्ती करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. जीएफएची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सुधारित घटनेचा मसुदा सर्व सदस्यांना पाठविण्यात येणार असून, खेळाडू संघटना स्थापन झाल्यानंतर २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याविषयी कायतान फर्नांडिस यांनी सांगितले, की "राष्ट्रीय क्रीडा सुशासन कायदा आणि एआयएफएफच्या घटनेशी सुसंगत घटना स्वीकारणारी भारतातील पहिली राज्य फुटबॉल संघटना होण्याची आमची अपेक्षा आहे."

कांपाल मैदानासाठी २०२३ पासून पाठपुरावा

जीएफए कार्यकारिणीने कांपाल येथील मैदानासंदर्भात पाठपुरावा करताना पणजी महानगरपालिका, पणजीचे आमदार आणि मुख्यमंत्री यांच्याकडे औपचारिक निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील फुटबॉलच्या समृद्ध इतिहासाशी कांपाल मैदानाचे अतूट नाते असून, हे मैदान फुटबॉलसाठी कायम राखले जावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.

यासंदर्भात संबंधित यंत्रणांशी लवकरच चर्चा सुरू केली जाईल. सध्याच्या कार्यकारिणीने २०२३ पासून ‘जीसुडा’ आणि संबंधित मंत्र्यांकडे या विषयावर सातत्याने पत्रव्यवहार केला असल्याची माहिती जीएफए अध्यक्ष कायतान यांनी दिली. "कांपाल मैदानाचा प्रश्न आता चर्चेत आला असला, तरी आम्ही २०२३ पासून यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहोत," असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa Wildlife: गोव्याचा 'गवा' राज्य प्राणी का? जंगलतोड, काजू बागायती अन् पाण्याच्या शोधात वाढतोय मानव-गवा संघर्ष

SCROLL FOR NEXT