Goa Fire Services Sports Festival Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Fire Services Sports Festival: अग्निशमन जवान मैदानात उतरणार! पणजीत 14 व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन; चार दिवस विविध स्पर्धांचा थरार

Firefighter Sports Events: अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या १४ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी पणजीतील सेंट इनेझ येथील गोवा स्टेट फायर फोर्स ट्रेनिंग ग्राउंडवर झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या १४ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी पणजीतील सेंट इनेझ येथील गोवा स्टेट फायर फोर्स ट्रेनिंग ग्राउंडवर झाले. संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन व्ही. रायकर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभही केला.

याप्रसंगी मध्य व दक्षिण विभागाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर, दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी फ्रान्सिस्को मेंडेस, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी श्रीपाद गावस, साहाय्यक विभागीय अधिकारी बॉस्को फेर्रांव तसेच विविध अग्निशमन केंद्रांचे अधिकारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना आणि शिस्त हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. क्रीडा स्पर्धांमुळे या गुणांचा विकास होण्यासह विविध केंद्रांतील कर्मचाऱ्यांमध्ये मैत्री, सहकार्य आणि निकोप स्पर्धेची भावना वाढीस लागते, असे डॉ. रायकर यांनी सांगितले.

विविध खेळांचा स्पर्धेत समावेश

हा महोत्सव १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला आहे. १७ रोजी फुटबॉल, १८ रोजी क्रिकेट, १९ रोजी व्हॉलीबॉल, तर २० रोजी ॲथलेटिक्स स्पर्धा होतील. ॲथलेटिक्समध्ये १००, ५०० आणि १,००० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश आहे. धावण्याच्या शर्यतींसाठी ४० वर्षांपर्यंत आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र गट असतील. फुटबॉल, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा लीग पद्धतीने होतील. प्रत्येक प्रकारातील अव्वल दोन संघ २४ नोव्हेंबरच्या अंतिम फेरीत खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Arabia Airstrike: मध्यपूर्वेत युद्धाचा भडका! सौदीने येमेनवर 24 तासांत डागली 81 क्षेपणास्त्रे; 15 जणांचा मृत्यू, हुतींचे 60 लष्करी तळ उद्ध्वस्त

Under 19 Cricket: 'देशासाठी करंडक जिंकण्याची अखेरची संधी'; गोव्याच्या व्यंकटची आशिया विजेतेपदामागची प्रेरणादायी कहाणी

रक्षकच भक्षक बनले तर मुलांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? गोव्यातील घटनांनी व्यवस्था आणि समाजासमोर गंभीर प्रश्न

Surya Gochar 2026: धन आणि समृद्धीचा योग! सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनाने 5 राशींच्या आयुष्यात येणार आर्थिक स्थिरता आणि भरभराट; भाग्य उजळणार

Goa Politics: मगोच्या 'एकला चलो रे'चा भाजपला मोठा फटका? फोंडा, शिरोड्यासह 5 जागांवर नजर

SCROLL FOR NEXT