Goa vs Gujarat Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Goa vs Gujarat Cricket Match: कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) डॉ. कॅप्टन के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेतील हा विजय गोव्यासाठी रणजी स्पर्धेपूर्वी मनोबल उंचावणारा ठरला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विजयासाठी १५१ धावांचे आव्हान स्वीकारल्यानंतर गोव्यासाठी कर्णधार अभिनव तेजराणा (नाबाद ६९) व सुयश प्रभुदेसाई (६१) यांची अर्धशतके, तसेच त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली ११० धावांची भागीदारी बुधवारी निर्णायक ठरली. त्या जोरावर त्यांनी गुजरातवर आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळविला.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) डॉ. कॅप्टन के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेतील हा विजय गोव्यासाठी रणजी स्पर्धेपूर्वी मनोबल उंचावणारा ठरला. अगोदरच्या लढतीत केएससीए अध्यक्षीय व विदर्भाविरुद्ध गोव्याला विजय थोडक्यात हुकला होता. गुजरातविरुद्धचा चार दिवसीय सामना बंगळूर येथील बाळ गंगाधरनाथ स्वामी शाळा मैदानावर झाला.

गोव्याने गुजरातचा दुसरा डाव बुधवारी सकाळी ६ बाद २४६ वरून २८७ धावांत गुंडाळला. गोव्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ (४-६९) परिणामकारक ठरला. गुजरातला एकूण १५० धावांची आघाडी मिळाली. सुयश व अभिनव यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर गोव्याने २४.५ षटकांतच विजयाची औपचारिकता पूर्ण करताना २ बाद १५३ धावा केल्या.

सुयशने ४८ चेंडूंतील खेळीत सहा चौकार व चार षटकार मारले, अभिनवने नाबाद खेळीत ८१ चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार लगावले. सुयशसोबतच्या शतकी भागीदारीव्यतिरिक्त अभिनवने दीपराज गावकर (नाबाद ९) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. अभिनवने पहिल्या डावातही ८० धावांची खेळी केली होती.

संक्षिप्त धावफलक : गुजरात, पहिला डाव : २४९ व दुसरा डाव : सर्वबाद २८७ (जयमीत पटेल ६३, सनप्रीत बग्गा ३४, शुभम तारी ५-०-२३-०, ललित यादव २४-३-५८-२, फेलिक्स आलेमाव २-०-२०-०, दर्शन मिसाळ १५.३-१-६९-४, दीपराज गावकर ३-०-१३-०, मोहित रेडकर ६-०-२७-०, यश कसवणकर १६-१-६७-३, अभिनव तेजराणा १-०-४-१) पराभूत वि. गोवा, पहिला डाव : ३८६ व दुसरा डाव : २४.५ षटकांत २ बाद १५३ (सुयश प्रभुदेसाई ६१, मंथन खुटकर ०, अभिनव तेजराणा नाबाद ६९, दीपराज गावकर नाबाद ९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Goa Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT