poorvaja verlekar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

WPL Auction 2026: गोव्याच्या पूर्वजा वेर्लेकरची डब्ल्यूपीएल लिलावात धडक; महिला प्रीमियर लीगच्या लिलाव यादीत मिळवले स्थान!

poorvaja verlekar wpl auction 2026: गोव्याची २५ वर्षीय बॅटर पूर्वजा वेर्लेकर हिने २०२५-२६ मोसमातील देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोव्याची २५ वर्षीय बॅटर पूर्वजा वेर्लेकर हिने २०२५-२६ मोसमातील देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्या आधारे निवड झाल्यानंतर तिने भारत ‘अ’ महिला संघातून जून महिन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, आता तिला आगामी वूमन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) लिलाव यादीत सामावून घेतले आहे. डब्ल्यूपीएल लिलावात समावेश असलेली पूर्वजा ही गोवा क्रिकेट असोसिएशनची एकमेव क्रिकेटपटू आहे. केरळमधील कोची येथे २८ ऑक्टोबर रोजी स्पर्धेसाठी खेळाडू लिलाव होईल.

या प्रक्रियेसाठी एकूण १४६ खेळाडूंची निवड करण्यात आली असून ११९ भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत. अनकॅप्ड गटात असलेल्या पूर्वजा हिच्यासाठी बोली रक्कम १० लाख रुपये आहे.

शिखा पांडेला यूपी वॉरियर्सने राखले

गोव्याची अनुभवी कसोटी-आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू शिखा पांडे डब्ल्यूपीएल स्पर्धेत सलग पाचवा मोसम खेळणार आहे. या वेगवान गोलंदाजास यूपी वॉरियर्सने २०२६-२७ मोसमासाठी राखले आहे. डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या पहिल्या तीन स्पर्धांत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळल्यानंतर गतवर्षी यूपी वॉरियर्सने लिलावात शिखा हिला २.४० कोटी रुपयांत करारबद्ध केले होते. शिखा हिने आतापर्यंत डब्ल्यूपीएल स्पर्धेतील ३५ सामन्यांत ३७ विकेट्स टिपल्या आहेत.

पूर्वजाची २०२५-२६ मोसमातील कामगिरी

गोव्यातर्फे (Goa) ६ टी-२० सामन्यांत १२५ धावा, १ अर्धशतक

एकदिवसीय स्पर्धेत गोव्यातर्फे ७ सामन्यांत ४४६ धावा, १ शतक व ३ अर्धशतके

आंतरविभागीय एकदिवसीय करंडक स्पर्धेत दक्षिण विभागाकडून ४ सामन्यांत १६४ धावा, १ शतक

आंतरविभागीय मल्टि-डे करंडक स्पर्धेत दक्षिण विभागातर्फे १ सामना, २९ धावा

Guru Ketu Yuti: नोकरी आणि व्यवसायात घवघवीत यश मिळवण्याची सुवर्णसंधी, सिंह राशीतील गुरु-केतु युती ठरणार फायदेशीर; आयुष्यात घेऊन येणार सुख, समृद्धी

Ranji Trophy: उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात गोव्याची पिछाडी; पण फिरकीपटूंच्या जोरदार माऱ्यामुळे सामना अजूनही रंगतीत!

Children Internet Rights: मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवणे हास्यास्पद; सर्वोच्च न्यायालयाचा पालकांना आणि समाजाला विचार करायला लावणारा मोठा निकाल!

आदि शंकराचार्यांच्या आत्महत्येचा दावा चुकीचा; माहिष्मतीचा वाद जिंकून त्यांनी केली होती चार पीठांची स्थापना! ऐतिहासिक चुकीवर प्रकाश

Goa Assembly Election 2027: युगोडेपात घराणेशाहीला कोणतेही स्थान नाही! मिकी पाशेको बाणावलीतून लढणार निवडणूक

SCROLL FOR NEXT