Under 23 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Dishank Misquin scores unbeaten 97 against Bihar: दिशांक मिस्कीनने संघ संकटात असताना चिवट फलंदाजी करत एकाकी झुंज दिली, त्यामुळे गोव्याला कठीण परिस्थितीतून सावरता आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दिशांक मिस्कीनने संघ संकटात असताना चिवट फलंदाजी करत एकाकी झुंज दिली, त्यामुळे गोव्याला कठीण परिस्थितीतून सावरता आले. आता २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक एलिट क क्रिकेट सामन्यात यजमान बिहारवर २९२ धावांची आघाडी घेतल्यामुळे विजयाची संधी प्राप्त झाली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

बिहारमधील राजगीर येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात ९ बाद २०१ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात त्यांना ९१ धावांची आघाडी मिळाली होती. बिहारचा पहिला डाव बुधवारी सकाळी ९ बाद १९४ वरुन २०४ धावांत संपुष्टात आला. सामन्याचा गुरुवारी अखेरचा चौथा दिवस होता. शानदार संयमी फलंदाजी केलेला डावखुरा दिशांक ९७ धावांवर खेळत आहे. त्याने १९८ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार व एक षटकार मारला. संघ ४ बाद ५२ असा संकटात असताना दिशांकने कर्णधार आर्यन नार्वेकर (३९) याच्या साथीत पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करून गोव्याला सावरले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : २९५ व दुसरा डाव : ७१ षटकांत ९ बाद २०१ (अमन धूपर ४, देवनकुमार चित्तेम १३, शंतनू नेवगी १९, दिशांक मिस्कीन नाबाद ९७, जीवनकुमार चित्तेम ०, आर्यन नार्वेकर ३९, अनुज यादव ५, दीप कसवणकर ७, विनायक कुंटे ५, पियुष देविदास ०, राहुल विश्वकर्मा नाबाद ०, राहुल कुमार २-३७, सुमन कुमार ५-४४). बिहार, पहिला डाव (९ बाद १९४ वरून) : ७२.१ षटकांत सर्वबाद २०४ (आयुष आनंद ५१).

पहिल्या डावातही अर्धशतकी छाप

डावखुऱ्या दिशांक मिस्कीनने बिहारविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी केली आहे. दुसऱ्या डावात ९७ धावांवर नाबाद असलेल्या या प्रतिभावान फलंदाजाने पहिल्या डावातही अर्धशतक करताना २०८ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या होत्या. बडोद्याविरुद्ध अगोदरच्या लढतीत त्याने अनुक्रमे ४५ व ९ धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Ranji Trophy: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

DA Hike Update: दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते वाढ; मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT