Arohi Borde Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa's Pride Arohi Borde : गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Arohi Borde gold medal 68th National Swimming Championship: गोव्याच्या आरोही बोर्डे हिने 68व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. स्पर्धा गुजरातमधील राजकोट येथे सुरू आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या आरोही बोर्डे हिने 68व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. स्पर्धा गुजरातमधील राजकोट येथे सुरू आहे.

राज्यातील अव्वल जलतरणपटू असलेल्या आरोही हिने 14 वर्षांखालील मुलींच्या 200 मीटर बटरफ्लाय शर्यतीत 2 मिनिटे 25.02 सेकंद अशी वेगवान वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सीआयएससीईच्या शेलिन सुनील हिला रौप्यपदक मिळाले. तिने 2 मिनिटे 25.15 सेकंदव वेळ नोंदविली, तर आसामच्या अंगरिका सैकिया हिने 2 मिनिटे 42.41 सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळविले.

आरोही ही कांपाल येथील खेलो इंडिया राज्य क्रीडा उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थी आहे. तिला या केंद्राचे जलतरण प्रशिक्षण टी. ए. सुजित यांचे मार्गदर्शन लाभते. आरोही मिरामार येथील शारदा मंदिर स्कूलमध्ये आठव्या इयत्तेत शिकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT