Football  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: गोवा पोलिसांची विजयी हॅटट्रिक! कळंगुटला नमवले; आज एफसी गोवा आणि गार्डियन्स भिडणार

Professional Football League 2024: गोवा पोलिस संघाने जीएफए प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साधताना गुरुवारी कळंगुट असोसिएशनला २-१ फरकाने नमविले. दि. ११ रोजी स्पर्धेत धुळेर स्टेडियमवर एफसी गोवा आणि गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब यांच्यात लढत होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा पोलिस संघाने जीएफए प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साधताना गुरुवारी कळंगुट असोसिएशनला २-१ फरकाने नमविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या ८१व्या मिनिटास बदली खेळाडू सॅम्युएल डिसोझा याने नोंदविलेल्या गोलमुळे गोवा पोलिस संघाला स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकता आला. त्यापूर्वी त्यांना रोनाल्डो ऑलिव्हेरा याने २२व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली होती. या गोलमुळे पोलिस संघ विश्रांतीला आघाडीवर होता.

५०व्या मिनिटास टुफेल हिंगोरा याने कळंगुट असोसिएशनसाठी बरोबरीचा गोल केला होता. सामन्यातील अखेरची नऊ मिनिटे बाकी असताना सॅम्युएलचा गोल पोलिस संघासाठी निर्णायक ठरला. लागोपाठ तीन सामने जिंकल्यामुळे गोवा पोलिस संघाचे आता नऊ गुण झाले आहेत. कळंगुट असोसिएशनला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन लढतीनंतर त्यांचे तीन गुण कायम राहिले आहेत. शुक्रवारी (ता. ११) स्पर्धेत धुळेर स्टेडियमवर एफसी गोवा आणि गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब यांच्यात लढत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT