FC Goa vs Punjab FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2025: चुरशीच्या लढाईत कोण मारणार बाजी? धाकड खेळाडूशिवाय एफसी गोवा करणार पंजाब एफसीशी मुकाबला

FC Goa vs Punjab FC: प्रमुख स्पॅनिश आघाडीपटू इकेर ग्वॉर्रोचेना याच्या अनुपस्थितीत एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दिल्ली येथे पंजाब एफसीविरुद्ध खेळेल.

गोमन्तक डिजिटल टीम

FC Goa vs punjab FC Iker Guarrotxena Misses Isl Match

पणजी: प्रमुख स्पॅनिश आघाडीपटू इकेर ग्वॉर्रोचेना याच्या अनुपस्थितीत एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दिल्ली येथे पंजाब एफसीविरुद्ध खेळेल. ३२ वर्षीय अनुभवी खेळाडूस आरोग्याच्या कारणास्तव सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे.

एफसी गोवा (FC Goa) व पंजाब एफसी यांच्यातील सामना गुरुवारी (ता. २७) दिल्ली येथे खेळला जाईल. सामना विषयक पत्रकार परिषदेत मंगळवारी एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ``इकेर संघासोबत दिल्लीचा प्रवास करणार नाही. आपली प्रकृती चांगली असल्याचे त्याला वाटत असले, तरी धोका न पत्करता आम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागत आहे. आरोग्य जास्त मौल्यवान आहे.``

एफसी गोवाने मागील लढतीत फातोर्डा येथे केरळा ब्लास्टर्सला २-० असे पराभूत केले होते. तेव्हा ग्वॉर्रोचेना याने पहिला गोल केला व नंतर त्याच्या असिस्टवर महंदम यासीर याने संघाची आघाडी वाढविली होती. सामन्याच्या भरपाई वेळेत सहकारी खेळाडू संदेश झिंगन याच्याशी झालेल्या धडकेत ग्वॉर्रोचेना याच्या डोक्याला मार लागला होता, त्यावेळी त्याला भोवळ आली होती.

विजयी मालिका राखण्याचे ध्येय

मोहन बागानने ५२ गुणांसह आयएसएल स्पर्धेत लीग शिल्डचा मान सलग दुसऱ्या मोसमात पटकावला आहे. एफसी गोवाचे २१ सामन्यांतून ४२ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याच जागी साखळी फेरीतील मोहीम संपविण्याचे ध्येय असल्याचा पुनरुच्चार मार्केझ यांनी मंगळवारी केला. ते म्हणाले, की ``आमचे आता दुसरा क्रमांक राखण्याचे उद्दिष्ट आहे. आमच्यासाठी असेच पुढे जाणे आवश्यक आहे. दिल्लीत (Delhi) (पंजाब एफसीविरुद्ध) पूर्ण तीन गुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला पुढील लढतीत जिंकावेच लागेल.``

बंगळूर एफसी प्ले-ऑफ फेरीत

बंगळूर एफसीने मंगळवारी घरच्या मैदानावर चेन्नईयीन एफसीला १-० फरकाने पराभूत करून आयएसएल स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठली. स्पर्धेत आतापर्यंत मोहन बागान (५२ गुण), एफसी गोवा (४२ गुण), बंगळूर एफसी व जमशेदपूर एफसी (प्रत्येकी ३७ गुण) या संघांनी प्ले-ऑफ फेरी निश्चित केली असून बाकी दोन जागांसाठी चुरस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT