FC Goa |Manolo Marquez  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा मैदान मारणार; बारापैकी सहा सामने घरच्या मैदानावर

Indian Super League: पहिला सामना जमशेदपूर एफसीविरुद्ध; गतमोसमात आयएसएल करंडकात उपांत्य फेरीत धडक

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एफसी गोवा संघ बारापैकी सहा सामने घरच्या (होम) मैदानावर खेळणार आहे. त्यांचा स्पर्धेतील अकराव्या आवृत्तीतील पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर होईल.

२१ सप्टेंबरला होणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्धच्या अवे सामन्यात एफसी गोवा संघ कोलकता येथील किशोर भारती क्रीडांगणावर खेळले. त्यानंतर कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर २७ सप्टेंबर रोजी त्यांचा ईस्ट बंगालविरुद्ध लढत होईल. आयएसएल स्पर्धेत मोहम्मेडन स्पोर्टिंग यंदा पदार्पण करत असून त्यांच्याविरुद्ध एफसी गोवा प्रथमच खेळणार आहे. मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा यंदा दुसरा मोसम आहे. गतमोसमात त्यांनी आयएसएल करंडकात उपांत्य फेरी गाठली होती.

एफसी गोवाचे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक ः तारीख १७ सप्टेंबर - विरुद्ध जमशेदपूर एफसी (फातोर्डा), तारीख २१ सप्टेंबर - विरुद्ध मोहम्मेडन स्पोर्टिंग (कोलकता), तारीख २७ सप्टेंबर - विरुद्ध ईस्ट बंगाल (कोलकता), तारीख ४ ऑक्टोबर - विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड (फातोर्डा), तारीख १९ ऑक्टोबर - विरुद्ध मुंबई सिटी (फातोर्डा), तारीख २४ ऑक्टोबर - विरुद्ध चेन्नईयीन एफसी (चेन्नई), तारीख २ नोव्हेंबर - विरुद्ध बंगळूर एफसी (फातोर्डा), तारीख ६ नोव्हेंबर - विरुद्ध पंजाब एफसी (फातोर्डा), तारीख २८ नोव्हेंबर - विरुद्ध केरळा ब्लास्टर्स (कोची), तारीख ४ डिसेंबर - विरुद्ध हैदराबाद एफसी (हैदराबाद), तारीख १४ डिसेंबर - विरुद्ध बंगळूर एफसी (बंगळूर), तारीख २० डिसेंबर - विरुद्ध मोहन बागान (फातोर्डा).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT