FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: अंधेरीत उजो! एफसी गोवाने 13 सामन्यांनंतर मुंबई सिटीला चारली पराभवाची धूळ; गोलचाही रेकॉर्ड

FC Goa Victory Against Mumbai City FC: तब्बल १३ सामने आणि पाच वर्षांनंतर एफसी गोवाचा मुंबई सिटी एफसीविरुद्ध इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील ‘वनवास’ संपुष्टात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: तब्बल १३ सामने आणि पाच वर्षांनंतर एफसी गोवाचा मुंबई सिटी एफसीविरुद्ध इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील ‘वनवास’ संपुष्टात आला. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने बुधवारी मुंबई येथे ३-१ फरकाने शानदार विजय नोंदवून स्पर्धेतील दुसरे स्थान भक्कम केले. आता ‘शिल्ड’च्या शर्यतीत ते मोहन बागानपेक्षा सात गुणांनी मागे आहेत.

स्पॅनिश मध्यरक्षक इकेर ग्वॉर्रोचेना याने पूर्वार्धात दोन गोल केले. त्याने अनुक्रमे २४ व ४१व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. एफसी गोवाच्या विजयात अन्य एक आणखी एक स्पॅनिश मध्यरक्षक बोर्हा हेर्रेरा याने ६४व्या मिनिटास केला. गोलक्षेत्रात गोलरक्षक ऋतिक तिवारी याने लाल्लियनझुआला छांगटे याला पाडल्यामुळे मुंबई सिटीस भरपाई वेळेत पेनल्टी फटका मिळाला. छांगटे याने ९०+७व्या मिनिटास अचूक नेम साधल्यामुळे एफसी गोवा क्लीन शीट राखणे शक्य झाले नाही.

एफसी गोवाचा हा २० सामन्यांतील अकरावा विजय ठरला. त्यांचे आता ३९ गुण झाले असून अव्वल स्थानावरील मोहन बागानचे ४६ गुण आहेत. प्ले-ऑफ फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुंबई सिटीला पाचवा पराभव पत्करावा लागला.

त्यामुळे २० लढतीनंतर ३१ गुणांसह ते पाचव्या क्रमांकावर कायम राहिले. तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूरचे ३४ गुण झाले आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना २२ फेब्रुवारीस फातोर्डा येथे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध होईल.

अखेर नोंदविला विजय

मुंबई सिटीविरुद्ध २०१९-२० पासून एफसी गोवास (FC Goa) विजय नोंदविता आला नव्हता. १३ सामन्यांत आठ पराभव आणि पाच बरोबरीनंतर एफसी गोवाने मुंबईतील संघाला आयएसएल स्पर्धेत पराभूत करण्याची किमया साधली.

ग्वॉर्रोचेना याने मुंबई सिटीच्या बचावफळीस गुंगारा देताना पहिल्या गोलच्या वेळेस अप्रतिम ड्रिबलिंग प्रदर्शन घडविले. विश्रांतीला चार मिनिटे असताना उदांता सिंगच्या असिस्टवर ३२ वर्षीय स्पॅनिश खेळाडूने गोलक्षेत्राच्या मध्यावरून अचूक नेम साधला.

मुंबई सिटीविरुद्ध २८ सामन्यांत आता एफसी गोवाने आठ विजय नोंदविले आहेत. मुंबई सिटीने १२ सामने जिंकले असून आठ सामने बरोबरीत राहिले. तब्बल १९२४ दिवसांनंतर एफसी गोवा संघ मुंबईत जिंकला. ७ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी मुंबई येथे विजय मिळविला होता, तर १२ फेब्रुवारी २०२० रोजी एफसी गोवाने मुंबई सिटीला अखेरच्या वेळेस नमविले होेते.

सलग २० सामन्यांत गोलचा विक्रम

एफसी गोवाने आयएसएलच्या एका मोसमातील सलग २० सामन्यांत गोल नोंदविण्याचा विक्रम साधला आहे. यंदा त्यांनी एकूण ३८ गोल नोंदविले आहेत.

बुधवारच्या लढतीनंतर स्पर्धेत ग्वॉर्रोचेना व हेर्रेरा यांनी प्रत्येकी पाच गोल केले आहेत. यंदा एफसी गोवातर्फे आर्मांदो सादिकू याने नऊ, तर त्याखालोखाल ब्रायसन फर्नांडिसने सात गोल केले आहेत. २०२२-२३ मध्ये मुंबई सिटीने सलग १९ सामन्यांत गोल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT