Manolo Marquez, Sunil Chhetri  X
गोंयचें खेळामळ

Sunil Chhetri: '..साऱ्या फुटबॉलपटूंनी सुनील छेत्रीचा आदर्श बाळगायला हवा', एफसी गोव्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले खास कारण

Manolo Marquez: बंगळूर एफसीविरुद्धच्या पुढील लढतीनिमित्ताने पत्रकार परिषदेत बोलताना एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी छेत्रीने खुल्या दिलाने कौतुक केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Manolo Marquez Praises Sunil Chhetri

पणजी: भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झालेला असला, तरी बंगळूर एफसीतर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत वयाच्या ४०व्या वर्षीही सक्रिय आहे. यंदा स्पर्धेत दहावा मोसम खेळताना त्याने अकरा सामन्यांत आठ गोल व एका असिस्टची नोंद केली. शनिवारी (ता. १४) बंगळूर येथे एफसी गोवा संघ बंगळूर एफसीविरुद्ध खेळणार आहे, त्यावेळी अनुभवी आघाडीपटू केंद्रस्थानी असेल.

बंगळूर एफसीविरुद्धच्या पुढील लढतीनिमित्ताने पत्रकार परिषदेत बोलताना एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी छेत्रीने खुल्या दिलाने कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘सुनील छेत्री महान आहे. त्याच्यावर बोलताना दिवस कमी पडेल. मला त्याची एक गोष्ट खूप भावते. गोल केल्यानंतर तो बेभान होत जल्लोष करत नाही, स्टँडकडे धावत सुटत नाही. उलट गोल केल्यानंतर तो ज्या खेळाडूने चेंडू पुरवत साह्य केले त्या खेळाडूचे अभिनंदन करतो, सहकाऱ्याला गोलचे श्रेय देतो. सुनीलचा हा निःस्वार्थीपणा आदर्शवत असून मला खूप भावतो. केवळ नवोदितांनीच, नव्हे तर साऱ्याच फुटबॉलपटूंनी छेत्रीचा आदर्श बाळगायला हवा.’’

मार्केझ एफसी गोवासह भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवत आहेत. सुनील छेत्रीने जून २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर मार्केझ भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले, त्यामुळे छेत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेला नाही.

छेत्रीने सात डिसेंबर रोजी बंगळूर येथे संघाच्या केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या विजयात शानदार हॅटट्रिक नोंदविली. ४० वर्षे व १२६ दिवसांचा असताना हॅटट्रिक नोंदविणारा तो सर्वांत वयस्क फुटबॉलपटू ठरला. मार्केझ म्हणाले, की ‘‘निश्चितच तो अतिशय धोकादायक फुटबॉलपटू आहे. त्याची शैली चतूर आहे. उंचीने कमी असला, तरी हवेतील चेंडूवर नियंत्रण राखण्याची त्याची हुकमत विलक्षण आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT