Pepe Villar Berengue Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोवाचे पुढचे पाऊल! पेपे व्हिलार बेरेंगुए नवे तांत्रिक संचालक

Pepe Villar Berengue: एफसी गोवाचे फुटबॉल संचालक लोकेश भेरवानी यांनी पेपे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवा संघाने पेपे व्हिलार बेरेंगुए यांची नवीन तांत्रिक संचालक आणि पद्धतशास्त्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

खेळाडू आणि प्रशिक्षक विकासातील व्यापक अनुभवासह, पेपे एफसी गोवाची शैली आणि प्रशिक्षण पद्धतीच्या विकास आणि अंमलबजावणीचे नेतृत्व करतील. पेपे यांनी १७ व्या वर्षी बार्सिलोना येथील विविध संघांसाठी खेळताना आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीची सुरवात केली.

२३ व्या वर्षी त्यांनी एफसी बार्सिलोनाशी संलग्न असलेल्या फुटबॉल शाळेत प्रशिक्षण देण्यास आरंभ केला, जिथे त्यांनी एफसी गोवाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्यासोबत काम केले. २००० साली त्यांनी ह्रिस्तो स्टोइचकोव फुटबॉल शाळा स्थापन केल्या, हा उपक्रमात त्यांनी २०१७ पर्यंत काम केले.

नवीन भूमिकेत पेपे हे खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या विकासासाठी सर्वसमावेशक ढांचा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतील, ज्यामुळे एफसी गोवा क्लब सातत्याने प्रगतीवर भर देईल.

एफसी गोवात सामील होण्याबद्दल त्यांनी सांगितले, की ``एफसी गोवात मी मानोलो मार्केझ यांच्यामुळे दाखल झालो आहे. या क्लबचे ध्येय माझ्या फुटबॉल विकासाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे असे मला वाटते. गोव्यातील फुटबॉलप्रेम हे माझ्या निर्णयामागील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, त्यामुळे मी आव्हान स्वीकारले.``

``माझे भारतीय फुटबॉलबद्दलचे ज्ञान सुरवातीला मर्यादित होते, परंतु एफसी गोवाच्या प्रशिक्षक आणि स्टाफची व्यावसायिकता व उत्साह पाहून मी प्रभावित झालो आहे. अर्थात, अजूनही सुधारणा करण्याच्या अनेक गोष्टी आहेत आणि त्या आम्ही करूच. उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करताना कठोरपणा आणि उत्साह कॅटलोनियातील अनेक क्लबच्या बरोबरीचा असेल हे मी मनापासून सांगतो. भारतातील फुटबॉल परंपरेनुसार प्रगती कायम राखण्यावर लक्ष केंद्रित करू,`` असे पेपे पुढे म्हणाले. एफसी गोवाचे फुटबॉल संचालक लोकेश भेरवानी यांनी पेपे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT