Super Cup 2025 Final Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Super Cup 2025 Final: फातोर्ड्यात रंगणार महामुकाबला! FC गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान; सलग दुसऱ्यांदा सुपर कप राखण्याची संधी

FC Goa Vs East Bengal: एफसी गोवा व ईस्ट बंगाल यांच्यातील सुपर कप अंतिम सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाने रविवारी (ता. ७) रात्री घरच्या मैदानावर एआयएफएफ सुपर कप सलग दुसऱ्यांदा आणि एकंदरीत तिसऱ्यांदा जिंकल्यास त्यांना आशियाई क्लब पातळीवरील स्पर्धेतील स्थान राखणे शक्य होईल, पण त्यासाठी त्यांना कोलकात्यातील ईस्ट बंगालचे कडवे आव्हान मागे सारावे लागेल.

एफसी गोवा व ईस्ट बंगाल यांच्यातील सुपर कप अंतिम सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. विजेतेपद मिळविणारा संघ एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या २०२६-२७ मधील प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरेल.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने २०२४-२५ मोसमातील सुपर कप विजेतेपदासह यावेळच्या चँपियन्स लीग २ स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. प्ले-ऑफ लढत जिंकून त्यांनी एएफसी चँपियन्स लीग २ च्या मुख्य फेरीत जागा मिळविली. अंतिम लढतीसाठी फुटबॉलप्रेमींना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश असेल.

सुपर कपच्या उपांत्य लढतीत ईस्ट बंगालने पंजाब एफसीवर विजय मिळविला होता. मात्र रविवारी ते स्पॅनिश प्रशिक्षक ऑस्कर ब्रुझाँ यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहेत. ब्रुझाँ यांना उपांत्य लढतीच्या पूर्वार्धातील भरपाई वेळेस मैदानावरील अशोभनीय वर्तनामुळे रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे ते अंतिम लढतीसाठी निलंबित आहेत.

ईस्ट बंगालचा संघ साहाय्यक प्रशिक्षक बिनो जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. एफसी गोवा संघ रविवारच्या महत्त्वाच्या लढतीत बचावफळीतील आधारस्तंभ संदेश झिंगन, तसेच मुंबई सिटीविरुद्ध लढत सुरू होण्यापूर्वीच रेड कार्ड मिळालेला आघाडीपटू इकेर ग्वॉर्रोचेना या प्रमुख खेळाडूंना मैदानात उतरणार आहे. झिंगन दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.

मैदानात उतरण्यापूर्वी...

सुपर कपमध्ये यापूर्वी एफसी गोवा २०१९ व २०२४-२५ मध्ये विजेता

ईस्ट बंगाल संघाला २०२४ मध्ये सुपर कप विजेतेपद

यावेळच्या स्पर्धेत एफसी गोवाचे साखळी फेरीत २ विजय, १ पराभव

ईस्ट बंगालचा साखळी फेरीत १ विजय, २ बरोबरी

उपांत्य फेरीत एफसी गोवाची मुंबई सिटीवर २-१, तर ईस्ट बंगालची पंजाब एफसीवर ३-१ फरकाने मात

आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे ईस्ट बंगालवर सलग ६ विजय

२०१८ सुपर कप उपांत्य लढतीत ईस्ट बंगालची एफसी गोवावर मात

फातोर्ड्यात ईस्ट बंगालविरुद्ध एफसी गोवा अपराजित

२०२४-२५ मधील आयएसएल मध्ये एफसी गोवाचे ईस्ट बंगालवर अनुक्रमे १-० व ३-२ फरकाने विजय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT