FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

FC Goa vs Al Qadsia: एएफसी चॅलेंज लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने तिन्ही सामन्यांत झुंझार खेळ केला; पण तीनपैकी दोन सामने गमावल्यामुळे त्यांना अखेर उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच परतीचे तिकीट काढावे लागले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एएफसी चॅलेंज लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने तिन्ही सामन्यांत झुंझार खेळ केला; पण तीनपैकी दोन सामने गमावल्यामुळे त्यांना अखेर उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच परतीचे तिकीट काढावे लागले. कुवेतमधील हवाली येथील महंमद अल हमाद स्टेडियमवर शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘क’ गटातील अखेरच्या लढतीत कुवेतच्या अल कादसा संघाने २-१ फरकाने पराभूत केले.

पुढील फेरी गाठण्यासाठी एफसी गोवासाठी विजय अत्यावश्यक होता. गटातील तिन्ही सामने जिंकून अल कादसा संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. बांगलादेशमधील फॉर्टिस एफसी, एफसी गोवा व ताजिकिस्तानच्या एफसी रेगार तादाझ या तिन्ही संघांचे प्रत्येकी एक व दोन पराभवांमुळे समान तीन गुण झाले व त्यांना अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक मिळाला.

‘क’ गटातील अखेरच्या लढतीत हमझा खब्बा याने १०व्या मिनिटास झेपावत हेडिंग साधत अल कादसा संघाला आघाडी मिळवून दिली, नंतर २१व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू चिकी (ख्रिस्तियन बोरेगो) याने अगदी जवळून हेडिंगवर एफसी गोवाला बरोबरी साधून दिली. त्याचा स्पर्धेतील सलग तिसरा गोल केला. त्याने हा गोल अलेक्स झालाया याच्या हेडिंग पासवर केला. नंतर ४९व्या मिनिटास हमझा याने आणखी एक गोल करून कुवेतमधील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Cricket: गोव्याचा माजी क्रिकेटपटू राष्ट्रीय निवड समितीवर, कृष्णा दास यांची नियुक्ती; बीसीसीआय ज्युनियर संघाची जबाबदारी

Florida Football Stadium Shooting: स्टेडियमजवळ अंदाधुंद गोळीबार; 6 अल्पवयीनांसह 12 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर Watch Video

Viral Video: जन्मताच बाळाच्या वरच्या ओठांवर चक्क मिशा! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस

Rahul Gandhi: राहुल गांधी गोव्यात पुन्हा येणार; भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीला भेट देणार का?

Cockroach Janata Party: 'विनाशकाले विपरीत बुद्धी!' तरुणाईच्या नव्या आंदोलनाची काँग्रेसला धास्ती?

SCROLL FOR NEXT