Dewald Brevis & Sherfane Rutherford Sixes Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

बेबी एबी अन् रदरफोर्डचं तूफान! सलग 6 चेंडूंवर ठोकले 6 षटकार, मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण; 11 वेळा चेंडू गेला मैदानाबाहेर VIDEO

Dewald Brevis & Sherfane Rutherford Sixes: क्रिकेटच्या मैदानात वादळ येणे म्हणजे काय असते, याचा प्रत्यय 2025 च्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये (SA20) आला.

Manish Jadhav

Dewald Brevis & Sherfane Rutherford Sixes: क्रिकेटच्या मैदानात वादळ येणे म्हणजे काय असते, याचा प्रत्यय 2025 च्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये (SA20) आला. प्रिटोरिया कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स केप टाउन यांच्यातील लढतीत 'बेबी एबी' म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस आणि कॅरेबियन पॉवर शेरफेन रदरफोर्ड यांनी धावांचा असा पाऊस पाडला की, मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः पाणी पाजले. या दोघांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर प्रिटोरिया कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स केप टाउनचा 85 धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवला.

11 वेळा चेंडू मैदानाबाहेर!

ब्रेविस आणि रदरफोर्ड या दोघांच्या खेळी जरी लहान होत्या, तरी त्या विजयासाठी निर्णायक ठरल्या. या दोघांनी मिळून प्रिटोरिया कॅपिटल्सच्या डावात केवळ 28 चेंडूंचा सामना केला. या अल्पशा चेंडूंमध्ये त्यांनी धावांचा डोंगर उभा केला. त्यांच्या फटकेबाजीचा जोर इतका प्रचंड होता की, तब्बल 11 वेळा चेंडू सीमारेषेबाहेरुन परत आणावा लागला. या 28 चेंडूंच्या प्रवासात त्यांनी 1 चौकार आणि तब्बल 10 उत्तुंग षटकार लगावले.

सलग 6 चेंडूंवर 6 षटकार

या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे सलग 6 चेंडूंवर मारलेले 6 षटकार. जरी हे षटकार एकाच फलंदाजाने किंवा एकाच ओव्हरमध्ये मारले नसले, तरी सांघिकरीत्या हा एक दुर्मिळ विक्रम ठरला. षटकारांचा हा सिलसीला 18व्या षटकाच्या 5व्या चेंडूपासून सुरु झाला आणि 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूपर्यंत कायम होता. 18व्या षटकात कॉर्बिन बॉश गोलंदाजी करत असताना डेवाल्ड ब्रेविसने शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन गगनचुंबी षटकार मारले. त्यानंतर 19व्या षटकात ड्वेन प्रिटोरियस गोलंदाजीला आला. स्ट्राईकवर असलेल्या शेरफेन रदरफोर्डने प्रिटोरियसच्या पहिल्या 4 चेंडूंवर सलग 4 षटकार खेचले. ब्रेविस आणि रदरफोर्ड यांच्यात जणू षटकार मारण्याची स्पर्धाच लागली आहे की काय, असे दृश्य मैदानावर दिसत होते.

स्ट्राईक रेटचा 'रुद्रावतार'

डेवाल्ड ब्रेविसने मुंबई इंडियन्स केप टाउनच्या गोलंदाजांची पिसं काढताना 13 चेंडूंमध्ये 276.92 च्या स्ट्राईक रेटने 36 धावा ठोकल्या. यात 4 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. मात्र, दुसरीकडे शेरफेन रदरफोर्डने तर वेगवान फलंदाजीचा नवा नमुना पेश केला. रदरफोर्डने 313.33 च्या स्ट्राईक रेटने केवळ 15 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा कुटल्या, ज्यात 6 भव्य षटकारांचा समावेश होता. दोघांनी मिळून केवळ 28 चेंडूंमध्ये 83 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला 220 धावांच्या पार पोहोचवले.

मुंबई इंडियन्स केप टाउनचा पत्ता कट

ब्रेविस-रदरफोर्डच्या या वादळामुळे प्रिटोरिया कॅपिटल्सने मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स केप टाउनचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. मुंबईचा संपूर्ण संघ 20 षटकांत केवळ 135 धावाच करु शकला आणि प्रिटोरिया कॅपिटल्सने 85 धावांनी दणदणीत विजय मिळवत वर्षाचा शेवट गोड केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

SCROLL FOR NEXT