I League 2024-25 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: धेंपो क्लबचा दणदणीत विजय! जोसेफची शानदार हॅटट्रिक; 25 गुणांसह नवव्या स्थानी झेप

Dempo Club Vs Aizawal FC: स्पर्धेतील आणखी दोन सामने बाकी असताना सातव्या विजयामुळे धेंपो क्लबचे आता २५ गुण झाले असून ते नवव्या क्रमांकावर आहेत.

Sameer Panditrao

I League Dempo Club Vs Aizawal FC

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबने महत्त्वाच्या सामन्यात विजयी कामगिरी साकारत आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील स्थान गमवावे लागणार नाही याची दक्षता घेतली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी सोमवारी झालेल्या लढतीत मिझोराममधील ऐजॉल एफसीवर ५-२ असा दणदणीत विजय प्राप्त केला.

धेंपो क्लबच्या विजयात त्रिनिदाद-टोबॅगोचा मार्कुस जोसेफ याने शानदार हॅटट्रिक साधली. याशिवाय पृथ्वेश पेडणेकर व विनय हरजी यांनीही प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेतील आणखी दोन सामने बाकी असताना सातव्या विजयामुळे धेंपो क्लबचे आता २५ गुण झाले असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. ऐजॉल एफसीला अकरावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १९ गुणांसह ते अकराव्या स्थानी कायम राहिले.

धेंपो क्लबला बाकी दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तरी त्यांच्या आय-लीग स्पर्धेतील जागेवर परिणाम होणार नाही. ऐजॉल एफसीविरुद्ध हेड-टू-हेड कामगिरी सरस असल्यामुळे धेंपो क्लब २०२५-२६ मोसमातही आय-लीग स्पर्धेत खेळणार हे निश्चित आहे. दहाव्या क्रमांकावर असलेल्या स्पोर्टिंग क्लब बंगळूरचे २० गुण झाले आहेत.

ऐजॉल एफसी आणि स्पोर्टिंग क्लब बंगळूरसमोर पदावनतीचा धोका कायम आहे. दिल्ली एफसी (१३ गुण) संघ बाराव्या स्थानी असून त्यांची यापूर्वीच आय-लीगमधून पदावनती झालेली आहे. तळाच्या दोन संघांना आय-लीगमधील स्थान गमवावे लागेल.

माजी विजेत्यांचा दमदार खेळ

माजी विजेत्या धेंपो क्लब संघ पूर्वार्धात २-१ फरकाने आघाडीवर होता. पृथ्वेश पेडणेकर याने पाचव्याच मिनिटास यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. २६व्या मिनिटास जोसेफने आजच्या सामन्यातील वैयक्तिक पहिला गोल केला. ३४व्या मिनिटास झोथानपुईया याने ऐजॉल एफसीची पिछाडी एका गोलने कमी केली. उत्तरार्धातील खेळात अखेरच्या १५ मिनिटांत आणखी तीन गोल करून धेंपो क्लबने विजय निश्चित केला. जोसेफ याने ७५व्या व नंतर ९०+६व्या मिनिटास गोल करून हॅटट्रिकचा मान मिळविला. याशिवाय विनय हरजी याने ७८व्या मिनिटास गोल नोंदवून धेंपो क्लबची आघाडी भक्कम केली. ९०+१व्या मिनिटास लालबियाकडिका याने ऐजॉल एफसीची पिछाडी २-५ अशी कमी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT