Cooch Behar Trophy 2024 Haryana Vs Goa Canva
गोंयचें खेळामळ

Cooch Behar Trophy: कल्याणी मैदानात रंगला सामना! बंगालविरुद्ध गोव्याचा डाव गडगडला, आता आराध्य-व्यंकट यांची जोडीच तारणहार!

Goa vs Bengal: गोव्याची मदार आराध्य गोयल व चिगुरूपती व्यंकट या सातव्या विकेटच्या भागीदारीवर अवलंबून आहे. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे सुरू आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ड’ गट सामन्यात बंगालच्या संघाने वर्चस्व राखले असून गोव्याची मदार आराध्य गोयल व चिगुरूपती व्यंकट या सातव्या विकेटच्या भागीदारीवर अवलंबून आहे. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे सुरू आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने पहिल्या डावात ६ बाद २०१ धावा केल्या होत्या. ते अजून १२४ धावांनी मागे आहेत. आराध्य गोयल (३६) व चिगुरूपती व्यंकट (२६) या जोडीने सातव्या विकेटसाठी ५० धावांची अभेद्य भागीदारी केली.

त्यापूर्वी, चिगुरूपती व्यंकट याच्या भेदक माऱ्यासमोर बंगालचा पहिला डाव कालच्या ५ बाद २९३ वरून ३२५ धावांत आटोपला. यजमान संघाने मंगळवारी सकाळी १०.१ षटकांत ३२ धावांत ५ गडी गमावले. बंगालचा संघ मोठी धावसंख्या उभारणार नाही याची दक्षता घेताना चिगुरूपती व्यंकट याने ५१ धावांत ५ गडी टिपले.

गोव्याला (Goa) आदित्य कोटा (१८) व सार्थक भिके (३०) यांनी ५१ धावांची सलामी दिली. मात्र, नंतर गोव्याचा डाव ४ बाद ८६ असा गडगडला. कर्णधार यश कसवणकर (३९) व आराध्य गोयल यांनी पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केल्यामुळे डाव थोडाफार सावरला. दिवसअखेर नाबाद असलेल्या आराध्य गोयल याने चिवट फलंदाजीत ९३ चेंडूंचा सामना करताना पाच चौकार मारले. इतर खेळाडूंनी त्याला साथ दिल्यास तो गोव्याचा डाव सावरू शकतो.

संक्षिप्त धावफलक

बंगाल, पहिला डाव (५ बाद २९३ वरून) : १००.१ षटकांत सर्वबाद ३२५ (चिगुरूपती व्यंकट १४.१-०-५१-५).

गोवा, पहिला डाव : ६५ षटकांत ६ बाद २०१ (आदित्य कोटा १८, सार्थक भिके ३०, शंतनु नेवगी १४, यश कसवणकर ३९, दिशांक मिस्कीन १, आराध्य गोयल नाबाद ३६, साई नाईक १६, चिगुरूपती व्यंकट नाबाद २६, रोहितकुमार दास २-५३, रोहित २-४८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT