Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I-League Football: चुरस चर्चिल ब्रदर्स आणि धेंपो स्पोर्ट्‌स क्लब यांच्यातील लढतीची; आय लीग स्पर्धेत होणार जोरदार घमासान!

Churchill Brothers VS Dhempo Sports Club: सध्या प्रत्येकी दहा गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी असलेल्या चर्चिल ब्रदर्स व धेंपो स्पोर्ट्‌स क्लब यांच्यातील लढत चुरसपूर्ण होण्याचे संकेत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आय लीग फुटबॉल स्पर्धेतील बहुचर्चित गोवन डर्बी बुधवारी (ता.१८) सासष्टीतील राया मैदानावर रंगणार आहे. सध्या प्रत्येकी दहा गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी असलेल्या चर्चिल ब्रदर्स व धेंपो स्पोर्ट्‌स क्लब यांच्यातील लढत चुरसपूर्ण होण्याचे संकेत आहेत. आय लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो क्लबने यंदा तब्बल दशकभराने पुनरागमन केले आहे.

गोव्यातील (Goa) या दोन मातब्बर संघातील आय लीगमधील अखेरची लढत २८ मार्च २०१४ रोजी झाली होती, तेव्हा धेंपो क्लबने ४-१ असा दणदणीत विजय प्राप्त केला होता. दोन्ही संघांतील एकूण आय लीग लढतींचा इतिहास पाहता, २२ लढतीत धेंपो क्लबने १३ विजय नोंदविले आहेत. सात लढतीत बरोबरीत राहिल्या असून दोनमध्ये चर्चिल ब्रदर्सने बाजी मारली. सध्याच्या फॉर्मनुसार, बुधवारी चर्चिल ब्रदर्सचे पारडे किंचित वरचढ राहील.

दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच लढतीतून तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशी समान कामगिरी नोंदविली आहे. गोलफरकात चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers) सरस आहे. त्यांनी दहा गोल केले असून धेंपो क्लबने पाच गोल नोंदविले आहे. चर्चिल ब्रदर्सचा दक्षिण आफ्रिकन आघाडीपटू वेड लेके चांगला खेळत असून त्याने पाच लढतीत चार गोल झळकावले आहेत. धेंपो क्लबचा सर्बियन मातिया बाबोविच याने दोन गोल केले आहेत. मागील चर्चिल ब्रदर्सने इंटर काशी संघावर ३-१ असा, तर धेंपो क्लबने श्रीनिदी डेक्कनला १-० संघाने पराभूत केले. यंदा आय-लीग स्पर्धेत गोव्याचा होणारा हा पहिलाच सामना आहे.

सध्याची कामगिरी सुखावणारी: समीर

धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी सांगितले, की ‘कोणत्याही प्रशिक्षकासाठी सध्याचे निकाल आणि दहा गुणांची कमाई सुखावणारीच असेल. एकंदरीत कामगिरीत आम्हाला अजूनही सुधारणेस वाव असून आम्ही आणखी सरस खेळ निश्चितच करू शकतो. आमचा संघ आता स्थिरावत आहे. संघात उशिरा दाखल झालेले आणि अगोदरचे खेळाडू यांच्यात समन्वय साधला आहे. साहजिकच आम्ही उत्साहित आहोत.’ दुखापतीमुळे दोघा खेळाडूंना धेंपो संघ मुकणार असला, तरी त्यांची जागा घेणारे खेळाडू संघात असल्याचा विश्वास समीर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT