Ajay Ratra Canva
गोंयचें खेळामळ

BCCI Selector: गोव्याचा रणजीपटूकडे भारतीय क्रिकेटमध्ये नवी जबाबदारी! अजय रात्रा आता निवड समितीत

Ajay Ratra: अजय रात्रा यांच्याकडे भारतीय क्रिकेटमध्ये आता महत्त्वपूर्ण जबाबदारी, समितीत रात्रा यांनी सलिल अंकोला यांची जागा घेतली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे चार मोसम खेळलेला माजी कसोटीपटू अजय रात्रा यांनी आता भारतीय क्रिकेटमध्ये नवी जबाबदारी स्वीकारली आहे. क्रिकेटपटू, प्रशिक्षक या नात्याने भरीव योगदान दिल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची पुरुष निवड समिती सदस्यपदी नियुक्ती केली.

मूळ हरियानातील असलेले ४२ वर्षीय अजय रात्रा गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये २००७-०८ ते २०१०-११ या कालावधीत खेळले. गोव्याकडून २० रणजी सामन्यांत त्यांनी ४८.६७ च्या सरासरीने १३६३ धावा करताना चार शतके व पाच अर्धशतकांची नोंद केली. यष्टिंमागे बळीचे अर्धशतक साकारताना ५० झेल व ६ यष्टिचीत अशी कामगिरी केली. निवृत्तीनंतर त्यांनी काही काळ गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अजय रात्रा भारताकडून सहा कसोटी व १२ एकदिवसीय सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९९ सामन्यांत ४०२९ धावा व यष्टिंमागे २६० बळी टिपले आहेत. मुख्य प्रशिक्षक या नात्याने त्यांनी आसाम, पंजाब, उत्तर प्रदेश संघालाही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) कार्यरत असताना रात्रा २०२३ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या प्रशिक्षण चमूत होते. क्लब पातळीवर त्यांनी ओएनजीसी संघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय निवड समितीत रात्रा यांनी सलिल अंकोला यांची जागा घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT