Arjun Tendulkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Arjun Tendulkar: केएससीएला पहिल्या डावात केवळ 103 धावा करता आल्या. यात अर्जुनने अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Pramod Yadav

Arjun Tendulkar

पणजी: अर्जुन तेंडुलकरने पुन्हा एकदा त्याच्या गोंलदाजीची कमाल दाखवत गोव्याला कर्नाटक विरोधात विजय मिळवून दिला आहे. अर्जुनने सामन्याच्या दोन्ही डावात आपल्या चेंडूची जादू दाखवत विरोधी संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

अर्जुनने दोन्ही सामन्यात एकूण नऊ बळी घेतले. सिंगचे वडील योगराज यांनी काही दिवसापूर्वी अर्जुनला कोळश्याची उपमा दिली होती, तोच कोळसा आता हिऱ्यासारखा चमकला आहे.

अर्जुन तेंडुलकर कर्नाटकात खेळल्या जाणाऱ्या डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेत तो गोव्याकडून खेळत आहे. 14 सप्टेंबर रोजी गोव्याचा संघ KSCA XI चा सामना करण्यासाठी मैदानात उतरला.

केएससीएला पहिल्या डावात केवळ 103 धावा करता आल्या. यात अर्जुनने अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने पहिल्या डावात 13 षटके टाकली ज्यात त्याचा इकॉनॉमी रेट 3.15 होता. त्याची एक ओव्हर मेडन होती आणि त्याला पाच विकेट घेण्यात यश आले. कर्नाटक संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या अक्षन रावलाही अर्जुनने बाद केले.

प्रत्युत्तरात गोव्याने पहिल्या डावात 410 धावा केल्या. अर्जुनने 18 धावांचे योगदान दिले. केएससीए दुसऱ्यांदा फलंदाजीला आला तेव्हा अर्जुनने पुन्हा खळबळ उडवून दिली. यावेळी त्याने 10 षटके टाकली आणि चार विकेट घेतल्या. अर्जुनने पुन्हा एकदा सर्वाधिक धावा करणाऱ्या स्मरण आरला बाद केले ज्याने 58 धावांची खेळी केली होती.

योगराज सिंग म्हणाले होते 'तो' कोळसा आहे...

काही दिवसांपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या एका वक्तव्याने मोठा वाद झाला होता. योगराज सिंग यांनी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला कोळसा म्हटले होते. अर्जुनला कोळशाचा हिरा करणाऱ्या कारागिराची गरज आहे, असे मत व्यक्त केले होते.

'तुम्ही कोळशाच्या खाणीत हिरा पाहिलाय का? तो (अर्जुन तेंडुलकर) कोळसा आहे. कोळसा एखाद्या चांगल्या कारागिराच्या हातात दिला तर तो कोहिनूर होऊ शकतो, पण तोच हिरा किंमत नसलेल्या माणसाच्या हातात गेला तर तो त्याचा नाश करू शकतो', असे योगराज यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT