Goa Cricket Association Annual Meeting Canva
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: 'जीसीए' आमसभा न्यायालयाच्या आदेशानुसार; उच्च न्यायालय वकिलांच्या निरीक्षणाखाली होणार बैठक

Goa Cricket Association: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) गेल्या २० ऑक्टोबर रोजी संस्थगित झालेली वार्षिक आमसभा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार येत्या ५ जानेवारी रोजी होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cricket Association Annual Meeting

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) गेल्या २० ऑक्टोबर रोजी संस्थगित झालेली वार्षिक आमसभा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार येत्या ५ जानेवारी रोजी होणार आहे.

बैठक उच्च न्यायालयाचे वकील ॲड. योगेश नाडकर्णी यांच्या निरीक्षणाखाली घेतली जाईल, अशी माहिती न्यायालयाच्या आदेशानंतर जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली.

जीसीए आमसभेत मागील २० ऑक्टोबर रोजी प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे विषय सूचीतील एकही विषय चर्चेस न येता वार्षिक आमसभा संस्थगित झाली. त्यानंतर जीसीए व्यवस्थापकीय समितीने वार्षिक आमसभेची नवी तारीख ठरविली नव्हती.

यानंतर जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी २८ नोव्हेंबर रोजी १५ डिसेंबर रोजी विशेष आमसभेसाठी नोटीस जारी केली. वार्षिक आमसभा न होता विशेष आमसभा घेण्याच्या अध्यक्ष विपुल यांच्या नोटिसीला आव्हान देत जीसीए व्यवस्थापकीय समितीतील सात सदस्यांनी संस्था महानिरीक्षक जिल्हा निबंधक (उत्तर) यांच्याकडे धाव घेतली. संस्था महानिरीक्षक उत्तर जिल्हा निबंधकांनी १३ डिसेंबर रोजी अध्यक्ष विपुल फडके यांनी बोलावलेली विशेष आमसभा कलम २० अ, सोसायटी नोंदणी कायदा १८६० अंतर्गत लांबणीवर टाकण्याचा आदेश दिला. १४ डिसेंबर रोजी जीसीए मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हरीश शिंदे यांनी पत्रकाद्वारे १५ डिसेंबर रोजीची विशेष आमसभा रद्द केल्याचे जाहीर केले.

संस्था महानिरीक्षक जिल्हा निबंधक (उत्तर) यांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका जीसीए अध्यक्ष विपुल फडके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली. त्यावर सुनावणी होऊन खंडपीठाने संस्थगित आमसभा ५ जानेवारी रोजी उच्च न्यायालय वकिलाच्या निरीक्षणाखाली घेण्याचे आदेश दिले. जीसीए सचिव रोहन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजीच्या वार्षिक आमसभेतील विशेष सूचींवर ५ जानेवारीच्या आमसभेत चर्चा होईल, तसेच अध्यक्ष विपुल यांनी बोलावलेल्या विशेष आमसभेच्या विषय सूचीतील अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालावर चर्चा करण्यास व्यवस्थापकीय समिती तयार असून तसे आम्ही न्यायालयात मान्य केले आहे. त्यानुसार नव्या तारखेने जीसीएची वार्षिक आमसभा पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT