All Goa Under 15 State Level Chess Competition Selection Test  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Under 15 Chess Competition: अखिल गोवा निवड चाचणी स्पर्धेत एथन, सईजा यांना जेतेपद; वाझ पुन्हा अपराजित

Goa Chess Tournament: अखिल गोवा १५ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत खुल्या गटात इंटरनॅशनल मास्टर एथन वाझ याने अपराजीत कामगिरीसह विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये सईजा देसाई विजेती ठरली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अखिल गोवा १५ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत खुल्या गटात इंटरनॅशनल मास्टर एथन वाझ याने अपराजीत कामगिरीसह विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये सईजा देसाई विजेती ठरली.

एथन याने खुल्या गटात सर्वाधिक साडेसहा गुण नोंदविले. जोशुआ तेलिस याला दुसरा, अनिकेत एक्का याला तिसरा, तर शुभ बोरकर याला चौथा क्रमांक प्राप्त झाला. राजवीर पाटील, सरस पोवार, अर्थ शेणवी कारापूरकर यांना अनुक्रमे पाचवा ते सातवा क्रमांक मिळाला.

मुलींमध्ये अव्वल ठरलेल्या सईजा हिने पाच गुणांची कमाई केली. राचेल परेरा हिला दुसरा, वैष्णवी परब हिला तिसरा, तर इसरा रिकार्टी हिला चौथा क्रमांक मिळाला. जेनिस सिक्वेरा, श्रीया पाटील व नव्या नार्वेकर यांनी अनुक्रमे पाचवा ते सातवा क्रमांक मिळविला.

श्लोक मेस्ता, शौर्य प्रभू अग्रासनी, रिशित गावस, प्रयांक गावकर, सयुरी नास्नोडकर, स्कायला रॉड्रिग्ज, कृतिका अगरवाल, आराध्या देसाई यांनी वयोगटात बक्षीस मिळाले.

बक्षीस वितरण भगवती भट, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी, उपाध्यक्ष दामोदर जांबावलीकर, डॉ. अनिरुद्ध भट, ज्योत्स्ना सारिपल्ली, रिदिकेश वेर्णेकर यांच्या उपस्थितीत झाले. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने मडगाव सरकारी महाविद्यालयाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याच्या गणेशोत्सवात रमली अभिनेत्री समीरा रेड्डी; फोटो शेअर करत म्हणाली, 'ही नवी सुरुवात...'

Viral Video: अटारी बॉर्डरवर पाकड्यांची 'पोलखोल'! पाकिस्तानच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य, तर भारताची बाजू स्वच्छ; पावसाचा व्हिडिओ व्हायरल

Goa Film Shooting: फिल्म इंडस्ट्रीला सावंत सरकारचं 'गिफ्ट', गोव्यातील शूटिंगसाठी आता सिंगल-विंडो सिस्टिम; वेळ आणि पैशाची होणार बचत

धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलीने सरकारी शाळेच्या वॉशरुममध्ये दिला बाळाला जन्म

गाडी चालवताना आला दारुचा वास, गोव्यात Drink & Drive प्रकरणी केरळचा नागरिक दोषी; कोर्टाने ठोठावला 10,000 दंड

SCROLL FOR NEXT