All Goa Under 15 State Level Chess Competition-Selection Test Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Under 15 Chess Competition: बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत एथन, राजवीरला संयुक्त आघाडी; मुलींत सईजा, वैष्णवी, राचेल यांचे वर्चस्व

Goa Chess Tournament: अखिल गोवा १५ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत खुल्या गटात इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझ व राजवीर पाटील यांनी संयुक्त आघाडी घेतली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अखिल गोवा १५ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत खुल्या गटात इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझ व राजवीर पाटील यांनी संयुक्त आघाडी घेतली आहे.

मुलींत सईजा देसाई, वैष्णवी परब व राचेल परेरा यांनी संयुक्त अव्वल कामगिरी बजावली आहे. एथन व राजवीर यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. सलग चौथा विजय नोंदविताना अव्वल मानांकित एथनने मयुरेश देसाई याच्यावर मात केली.

राजवीरने एड्रिक वाझ याला नमविले. मुलींच्या गटात चौथ्या फेरीत राचेल हिने सईजा हिला बरोबरीत रोखले, तर वैष्णवी हिने काया कुतिन्हो हिला नमवून गुणसंख्या साडेतीनवर नेली.

स्पर्धेचा समारोप रविवारी होईल. सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने स्पर्धा घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT