Shami Tree Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Shami Tree: 400 जणांनी प्राण दिले, पण शमीवृक्ष तोडू दिला नाही! पांडवांच्या शस्त्रांशीही जोडलेला आहे या पवित्र झाडाचा इतिहास

Hindu Religious Traditions: पौराणिक आख्यायिकेनुसार, जेव्हा पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास प्राप्त झाला

गोमंतक ऑनलाईन टीम

मधू य. ना. गावकर

पौराणिक आख्यायिकेनुसार, जेव्हा पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास प्राप्त झाला, तेव्हा त्यांनी आपल्या अस्त्र-शस्त्रांचे रक्षण करण्यासाठी एका उंच शमीवृक्षाची निवड केली होती. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपली शस्त्रे या झाडावर लपवून ठेवली होती.

पृथ्वीने आपला समतोल राखण्यासाठी सर्वच जीवांना काम वाटून दिले आणि त्या कामांची नोंद घेण्यास माणसाला जन्म दिला, बुद्धिवान माणसाने पृथ्वीवरील सर्व सजीवांचे काम, त्यांच्या कामाचे गुण, राग-रंग पाहून त्याला स्वार्थाचा बाजार आठवला. त्या बाजारात त्याने निर्मळ झरे, पाण्याने भरलेले तलाव, नद्या, हिरवेगार डोंगर, शेती, मोठाले वृक्ष, जनावरे नष्ट करत भूमीचा सम्राट बनण्यासाठी खटपट चालवलेली दिसते.

भारतीय संस्कृतीत निसर्गाला देवाचे रूप मानले गेले आहे. आपल्या ऋषीमुनींनी झाडे, नद्या, पर्वत आणि पशू-पक्षी यांच्याशी मानवाचे नाते अगदी अतूट जोडले आहे. या समृद्ध वृक्षवल्लीमध्ये ‘शमीवृक्ष’ (Prosopis cineraria) या वनस्पतीला अत्यंत पवित्र, पूजनीय आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. शमीच्या झाडाला केवळ एक वनस्पती न मानता त्याला साक्षात ‘देवपण’ प्राप्त झाले आहे, असे मानले जाते. धार्मिक ग्रंथांपासून ते ऐतिहासिक विजयांच्या गाथांपर्यंत शमीचे महत्त्व सर्वमान्य आहे.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये शमीवृक्षाला अत्यंत उच्च स्थान आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, जेव्हा पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्ष अज्ञातवास प्राप्त झाला, तेव्हा त्यांनी आपल्या अस्त्र-शस्त्रांचे रक्षण करण्यासाठी एका उंच शमीवृक्षाची निवड केली होती. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपली शस्त्रे या झाडावर लपवून ठेवली होती. जेव्हा अज्ञातवासाचा काळ संपला, तेव्हा पांडवांनी याच शमीवृक्षाची पूजा करून आपली शस्त्रे पुन्हा प्राप्त केली आणि नंतर महाभारताच्या युद्धात विजय मिळवला.

याचप्रमाणे, भगवान श्रीरामांनी लंकान्वेषणासाठी निघण्यापूर्वी आणि विजयादशमीच्या (दसरा) दिवशी शमीवृक्षाची पूजा केली होती, अशी मान्यता आहे. म्हणूनच विजयोत्सवाचे प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना वाटण्याची आणि ‘सोने लुटण्याची’ सुंदर परंपरा देशात जपली जाते. शमी केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये शमीच्या विविध अंगांचा (पाने, मूळ, त्वचा आणि शेंगा) उपयोग विविध रोगांवर औषध म्हणून केला जातो.

शमीच्या पानांची पेस्ट जखमांवर लावल्यास जखम लवकर भरून येते आणि जंतुसंसर्ग होत नाही. शमीच्या सालीचा काढा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शमी हा अतिशय कणखर वृक्ष आहे. हा वृक्ष प्रामुख्याने वाळवंटी किंवा दुष्काळी भागात आढळतो. कमी पाणी आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणातही हा वृक्ष हिरवागार राहू शकतो. शमीची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात, ज्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने हा वृक्ष अतिशय मोलाचा आहे.

थोडक्यात सांगायचे तर, शमीवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. तो संयम, शक्ती, पवित्रता आणि विजयाचा संदेश देतो. ज्या वनस्पतीमध्ये देवत्व, आरोग्य आणि पर्यावरण रक्षण या तिन्ही गोष्टींचा संगम आढळतो, तो आपला ‘शमीवृक्ष’ खऱ्या अर्थाने देवपण लाभलेला एक पवित्र वृक्ष आहे. आजच्या आधुनिक युगात अशा पवित्र वृक्षांचे जतन करणे आणि त्यांची जोपासना करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

वड, पिंपळ, रुमड, बेल, मंदार, चाफा, अर्जुन, वानवा, बकुळी, शिवलिंग, सुरंग, यामी, कलम, आपटय, असे वृक्ष आहेत. त्या प्रमुख वृक्षात शमी हा महत्वाचा वृक्ष आहे. आपल्यातील प्राणवायू सोडून, कार्बन वायू शोषून घेतात. माणसाचे आरोग्य राखणारा हिंदू संकृतीत मानाचे स्थान मिळालेला असा तो पवित्र शमीवृक्ष आहे, त्याची ओळख फारच कमी लोकांना आहे, हिंदू संस्कृतीत त्याला देवाचे स्थान आहे, शमीवृक्ष गोव्यात विरळच पहावयास मिळतात, मी प्राध्यापक राजेंद्र केरकरांसोबत त्यांनी सुरू केलेल्या परिक्रमेत भाग घेण्यास खोर्जुवे बेटावर गेलो होतो.

तिथे एका देवळाच्या परिसरात शमी हा वृक्ष पहावयास मिळाला, त्या वृक्षाला जरी बाभळीच्या झाडाप्रमाणे काटे असले तरी पाहाण्यास तो सुंदर दिसतो, श्रावण महिन्यातील रविवारच्या पूजनास अगर माघी गणेश चतुर्थीस शमीची पत्री वापरतात, पण काहींना शमीच्या झाडाची ओळख नसल्याने ते त्या झाडाप्रमाणे दिसणाऱ्या बाभुळ, खैर, देवबाभूळ, हीवर, दुरंगी, अशा वृक्षांची पत्री वापरतात. कारण अशा वृक्षांची पाने आणि अंग शमीच्या झाडा-सारखे दिसते. संस्कृत भाषेत त्या वृक्षाला शमी म्हणतात, राजस्थान, हरियाणा, कच्छ मध्ये लोक याला खेजडी म्हणतात, ज्यावेळी चिपको आंदोलन झाले, त्यावेळी बिष्णोई समाजाने शमीवृक्ष कापण्यास विरोध केला.

त्यांनी प्रत्येक वृक्षाला मिठी मारून प्रथम आमचे प्राण घ्या, असे वृक्ष काप‌णाऱ्यांना ठणकावून सांगितले, १७३० साली जोधपूरच्या अभयसिंग महाराजांनी महाल बांधकामासाठी शमीचे वृक्ष कापून आणण्याचे आदेश आपल्या सैनिकांना दिले, ते झाडे कापण्यास गावालगतच्या जंगलात गेले. तिथल्या गावकऱ्यांनी झाडे कापण्यास प्रखर विरोध केला. पण राजाचे सैनिक माघार घेईना, ही गोष्ट राजाच्या कानावर पडली, चिडलेल्या राजाने कोकांना मारण्याचा हुकूम सोडला. सैनिकांनी चारशे लोकांचे बळी घेतले. सारा परिसर रक्ताने न्हाऊन गेला, हे राजाला कळताच त्यांनी शमीवृक्ष तोडीचा हुकूम रद्द केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT