Padma Shri Prasad Sawkar Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

memories of padma shri prasad sawkar: पद्मश्री प्रसाद सावकार नुकतेच हे जग सोडून गेले. पण माणूस गेला तरी त्याच्या बऱ्या वाईट आठवणी साथ देत राहतातच.

गोमंतक ऑनलाईन टीम

मिलिंद म्हाडगुत

तो सत्कार मी कसा विसरेन? एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्थेने केलेला तो ‘सत्कार’ माझी मर्मबंधातील ठेव बनला आहे, असे सावकार बोलून गेले. त्यांची ती ‘ठेव’ आमचीही ‘ठेव’ बनली होती. आठवणी अशाच असतात. ‘याद न जाये, बीते दिनो की’ म्हणत सुगंध दरवळत राहतो.

पद्मश्री प्रसाद सावकार नुकतेच हे जग सोडून गेले. पण माणूस गेला तरी त्याच्या बऱ्या वाईट आठवणी साथ देत राहतातच. ‘जाने वाले कभी नही आते, जाने वालों की याद आती है’ असे जे म्हटले जाते, ते यामुळेच. म्हापसा इथे पाचवीत शिकत असताना ‘पंडितराज जगन्नाथ’ हे नाटक पाहण्याचा योग आला.

खरंतर संगीतावर आधारित हे नाटक आमच्यासारख्या लहान मुलांच्या पचनी न पडणारे. पण असे असूनही त्यातले प्रसाद सावकार यांनी गायलेले ‘जय गंगे भागीरथी’ हे गाणे मला विलक्षण आवडले. एवढे आवडले की, ते माझ्या मर्मबंधातील ठेवच बनले. नंतर मी पुण्याला गेल्यावर प्रसाद सावकारांची अनेक नाटके पाहिली. पण त्यातले एकही नाटक वा गाणे ‘भागीरथी’चा तो ठसा पुसू शकले नाही.

या माणसाचा कधीतरी भव्य सत्कार करावा, असे मला नेहमी वाटायचे, पण योगच येत नव्हता. शेवटी २००६ साली ही संधी मिळाली. त्यावर्षी प्रसाद सावकारांना पद्मश्री जाहीर झाली होती. योगायोगाने त्यावर्षी मी वास्कोच्या एमईएस महाविद्यालयाचा प्राचार्य होतो. त्यामुळे मी लगेच त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय आमच्या मुरगाव शिक्षण संस्थेचे जनक व तत्कालीन अध्यक्ष कै. वसंतराव उर्फ अण्णा जोशी तसेच आमच्या संस्थेचे प्रणेते निवृत्त प्राचार्य माधवराव कामत सर यांना सांगितला.

दोघेही कलेचे पुजारी असल्यामुळे लगेच हिरवा कंदील मिळाला. आणि मी सूत्रे हलवायला सुरुवात केली. बाकी सगळ्या गोष्टी जमल्या पण ‘जय गंगे भागीरथी’ या गाण्याची सीडी काही मिळेना. मला त्यांचा हेच गाणे लावून सत्कार करायचा होता. पण म्हापसा, फोंडा, पणजी, मडगाव येथील अनेक दुकाने पालथी घालूनही सीडी काही हाताला लागेना. त्या काळात यूट्युब,गुगल अशी आजच्यासारखी माध्यमे अस्तित्वात नव्हती.

त्यामुळे आता या गाण्याशिवाय सत्कार करावा लागतो असे वाटू लागले. पण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजता आमचे एक शिक्षक नंदन हेगडे यांनी फोन करून सीडी मिळाली असून उद्या कॉलेजमध्ये घेऊन येतो, असे सांगितले. हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि हेच गाणे लावून मी दुसऱ्या दिवशी अण्णांच्या हस्ते आणि प्राचार्य कामत सरांच्या उपस्थितीत सावकारांचा भव्य सत्कार घडवून आणला.

आपल्या सौभाग्यवतीबरोबर आलेले सावकार हे गाणे लागल्यावर बरेच भारावले होते. एका महान कलाकाराचा सत्कार आपल्या हातून झाला म्हणून अण्णा व कामत सर दोघेही जाम खुश. मलाही कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर सावकारांशी झालेली ‘बातचीत’ही यादगार ठरली. त्यांच्या बोलण्यातून त्यांची कलेशी असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा ठायीठायी अधोरेखित होत होता.

नंतर अनेक वर्षांनी ते मला ‘अवघा रंग एकची झाला’च्या एका प्रयोगाला भेटले. त्यावेळी मी त्यांना आमच्या ‘त्या सत्कारा’ची आठवण करून दिली. तो सत्कार मी कसा विसरेन? एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्थेने केलेला तो ‘सत्कार’ माझी मर्मबंधातील ठेव बनला आहे, सावकार बोलून गेले. त्यांची ती ‘ठेव’ आमचीही ‘ठेव’ बनली होती. आठवणी अशाच असतात. ‘याद न जाये, बीते दिनो की’ म्हणत सुगंध दरवळत राहतो. आज प्रसाद सावकार आपल्यात नसले तरी ते मनात वसलेल्या अशा आठवणींद्वारे मनाचे दरवाजे कायम खटखटत राहतील, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT