Mangrove  Canva
गोंयकाराचें मत

Goa Mangroves: गोव्याचे नैसर्गिक वैभव! हवेतून कार्बन-डाय-ऑक्साइडचे शोषण करण्याच्या बाबतीत खारफुटी 'चॅम्पियन'

Mangrove Forest Goa: गोव्यात खारफुटीच्या (mangroves) सोळा प्रजाती आहेत आणि देशातील सर्वोत्तम खारफुटीच्या जंगलापैकी एक गोव्यातील खारफुटींचे जंगल आहे.

Sameer Panditrao

Mangrove In Goa

गोव्यात खारफुटीच्या (mangroves) सोळा प्रजाती आहेत आणि देशातील सर्वोत्तम खारफुटीच्या जंगलापैकी एक गोव्यातील खारफुटींचे जंगल आहे. मांडवी नदीतील चोडण बेट हे खारफुटीच्या सर्वोत्तम जंगलांपैकी एक आणि गोव्यात आढळणाऱ्या बहुतेक प्रजातींचे घर आहे.

मांडवी, जुवारी, शापोरा, तेरेखोल साळ, तळपण, गालजीबाग, कुंभारजुवे इथल्या नद्यांमधील खाड्यांमध्ये खारफुटीचे जंगल आहे. मांडवी, जुवारी आणि कुंभारजुवा कालवा हे खारफुटींचे तीन हॉटस्पॉट आहेत. या खारफुटींच्या जंगलात वेगवेगळ्या अनोख्या आणि दुर्मिळ वनस्पतींचाही समावेश आहे. 

मात्र दुर्दैवाने अनियंत्रित शहरी विकास, वाढते प्रदूषण, राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार, पूल आणि वाढलेले पर्यटन यामुळे खारफुटींच्या जंगलांवर विनाशकारी परिणाम झालेला आहे. खारफुटींच्या खालावत चाललेल्या परिस्थितीबद्दल जनजागृतीचा मागोवा घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते.

त्यामध्ये, ‘खारफुटीं, त्यांचे अस्तित्व, त्यांची होणारी घट आणि त्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना यांची माहिती आहे का’ असे प्रश्न विचारण्यात आले होते. बहुतेक लोकांना खारफुटींबद्दल माहिती होते परंतु त्यांच्या परिसरात त्यांनी खारफुटींची घट अनुभवली नव्हती.

बहुतेकांनी सुचवले की जनजागृती करणे, खारफुटींचे फार्म तयार करणे आणि खारफुटींच्या रक्षणासाठी कठोर नियम लागू करणे यातून खारफुटींचे संवर्धन होऊ शकते.

1988 च्या राष्ट्रीय वनधोरणामध्ये भारतातील खारफुटींच्या जंगलांचा समावेश वन संशोधनासाठी प्राधान्य क्षेत्र म्हणून करण्यात आला आहे. या नैसर्गिक वन परिसंस्थेचे प्रभावीपणे संरक्षण आणि व्यवस्थापन व्हावे हा त्यामागचा उद्देश होता. 

गोव्याचे सरकार, प्रसार माध्यमे, पर्यावरणीय गट, शिक्षणतज्ज्ञ गोव्यातील खारफुटीच्या जंगलाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या बाबतीत केवळ सक्रियच नाहीत तर त्यांचा विकास व्हावा या दिशेनेही ते काम करत आहेत मात्र किनारी भागातील विकास कामे खारफुटींचे जंगल असुरक्षित बनवत आहे हे ही तितकेच खरे आहे.

‘गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ (सीझेडएमए) किनारी भागातील घडामोडींचे नियमन करत असली तरी अजूनही खूप काही करण्याची गरज आहे कारण प्रादेशिक आणि विकास योजनांमध्ये वारंवार होणारे बदल किनाऱ्यांना अधिक असुरक्षित बनवत चालले आहेत.

मात्र खारफुटीसंबंधीचा अलीकडील डेटा उत्साहवर्धक आहे.‌ 2019 मध्ये 4975 चौरस किलोमीटर असलेले खारफुटीचे आच्छादन 2021 मध्ये 4992 चौरस किलोमीटर बनलेले आढळून आले आहे. तथापि तज्ज्ञांनुसार खारफुटीचे अच्छादन वाढवण्यासाठी आणखी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे.

हवेतून कार्बन-डाय-ऑक्साइडचे शोषण करण्याच्या बाबतीत खारफुटी 'चॅम्पियन' आहेत. हवेतील प्रत्येक टन कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकण्याचे मूल्य आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीतरी डॉलर्स आहे हे जर लक्षात घेतले तर खारफुटींच्या जंगलाच्या विकासाला पुढील काळात नक्कीच उज्वल भविष्य आहे. 

चंद्रकांत गोखले,

(अहवाल- गोव्यातील खारफुटींचे संवर्धन आणि पुनर्जीवन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

USA Cricket Board Suspended: पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या अमेरिका संघाला ICC चा दणका, सदस्यत्व केलं निलंबित; 'हे' ठरलं कारण

IND vs AUS: 14 वर्षांचा पोरगा बनला षटकारांचा नवा बादशाह! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; तूफानी खेळीनं उडवली कांगांरुची झोप VIDEO

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

SL Bhyrappa Passed Away: प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन; वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Crime: सरकारी अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, लंडनला गेला पळून; वर्षभराने संशयिताला कलकत्त्यात अटक

SCROLL FOR NEXT