गोमन्तक डिजिटल टीम
२६ जुलै रोजी खारफुटी दिन होता. गोवा राज्याची परिसंस्था खारफुटीने समृद्ध आहे. या खारफुटीचे महत्व आपणास माहित आहे का?
चोडण बेटावरील खारफुटी जंगल ही समृद्ध परिसंस्था म्हणून बघितली जाते. मांडवी, झुवारी आणि साळ नद्यांमध्ये तसेच कुंभारजुवा किनारी भागात खारफुटी आहेत.
मासे, पक्षी तसेच असंख्य समुद्री प्रजातींसाठी खारफुटीचे जंगल निवासस्थान म्हणून काम करते.
किनारपट्टी परिसरात होणारी धूप, समुद्राच्या लाटांच्या नुकसानीपासून तसेच पूरपरिस्थितीपासून किनारपट्टीचे संरक्षण करण्यात खारफुटीचे जंगल महत्वाची भूमिका बजावते.
पाण्याची गुणवत्ता राखण्याचे काम खारफुटी करत असते ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो.
खारफुटी कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि त्याची साठवण करतात ज्यामुळे हवामान बदलावेळी पूरक भूमिका घेऊन एकूण प्रभाव कमी करतात.
खारफुटी हे गोडे पाणी आणि खारे पाणी अर्थात सागरी परिसंस्थांना जोडते. किनारी पर्यावरण संस्थेत हे जंगल उपयुक्त दुवा ठरते.
खारफुटी जंगलात मासेमारी, मत्स्यपालन आणि इको-टूरिझम हे व्यवसाय होऊ शकतात. काही वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्मही आढळतात.
प्रदूषण, मानवी हस्तक्षेप, हवामान बदल यांमुळे खारफुटी जंगलांना धोका निर्माण होतोय. खारफुटी जंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
'बंगळुरू ते गोवा' एक अद्भुत सफर